आरोपी वाहनचालक पसार

नवी देहली : येथील नांगलोई परिसरात एका चारचाकी वाहन चालकाने एका ३० वर्षीय पोलीस शिपायाला त्याच्या गाडीखाली चिरडल्याने त्याचा मृत्यू झाला. चारचाकी गाडी चालवणारी व्यक्ती मद्य पुरवठादार असल्याचे समजते. हा चालक सध्या पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पोलीस शिपाई संदीप यांना एक वॅगनआर चारचाकी गाडी बेदरकारपणे येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर संदीप यांनी ही गाडी बेदरकारपणे चालवली जात असल्याचे पाहिले आणि चालकाला तसे न करण्यास सांगितले. त्याच वेळी अचानक गाडीचा वेग वाढला आणि तिने पोलीस शिपाई संदीप यांना पाठीमागून जोराची धडक दिली. तसेच संदीप यांना १० मीटरपर्यंत फरफटत नेले. यानंतर पुन्हा पुढे उभ्या असलेल्या दुसर्या एका चारचाकी गाडीला धडक दिली. या घटनेत संदीप गंभीररित्या घायाळ झाले. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
मातीपासून बनवलेल्या श्रीगणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करा ! – पंतप्रधान
छत्तीसगडच्या अलीशा खातूनने उत्तरप्रदेशच्या जोगेंद्र सैनीसोबत केला विवाह !
विवाहासाठी मुसलमान युवतीकडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव; हिंदु युवकाची आत्महत्या !
Rewa Beef Smuggling Arrests : रीवा (मध्यप्रदेश) येथे गो-तस्करी करणार्या २ मुसलमान बहिणींना गावकर्यांनी पकडले
Ram Mandir Donation Theft : चंपत राय, अनिल मिश्रा आणि गोपाल राय यांनी ३ दिवसांत अयोध्या सोडावी ! – ‘अयोध्या बार असोसिएशन’ने दिली समयमर्यादा
अचलपूर (जिल्हा अमरावती) येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिर संस्थानच्या १० कोटींच्या भूमीवरील कब्जेदाराचा दावा फेटाळला !