नास्तिकतावाद्यांच्या हत्या प्रकरणांमध्ये हिंदुत्वनिष्ठांना गोवण्यामागे षड्यंत्र ! – डॉ. अमित थडानी, शल्य चिकत्सक, समाजसेवक तथा लेखक

सनातन संस्था लोकांना संघटित करते. त्यामुळे तिला नास्तिकतावाद्यांच्या हत्या प्रकरणांमध्ये लक्ष्य करण्यात आले. या प्रकरणांमध्ये खरे मारेकरी शोधण्याचा प्रयत्न न करता अन्वेषण करण्यात आले.

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या द्वितीय दिनी ‘धर्म आणि मंदिरे यांचे रक्षण’ या विषयावर मान्यवरांनी मांडलेले परखड विचार !

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचाराचे प्रकरण वर्ष २०१० पासून मुंबई उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. या भ्रष्टाचाराची सी.आय्.डी. चौकशी पूर्ण होऊन ४ वर्षे झाली; मात्र अद्याप कारवाई झालेली नाही, हे खेदजनक आहे. सद्यःस्थितीतही मंदिरामध्ये भ्रष्टाचार चालू आहे.

वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या द्वितीय दिनी ‘मंदिर मुक्ती अभियान’ या सत्रात मान्यवरांनी केलेली भाषणे

श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीची अवहेलना प्रतिदिन चालू आहे. हा मंदिरांच्या सरकारी अधिग्रहणाचा दुष्परिणाम आहे, हे लक्षात घेऊन लवकरात लवकर ही मंदिरे सरकारमुक्त करणे, हाच यावरील एकमात्र उपाय आहे.

प्रादेशिक भाषा हेच शिक्षणाचे माध्यम; मात्र इंग्रजीतून शिकण्याचीही संधी ! – शिक्षण खाते, गोवा

इंग्रजीतून शिकण्याचीही संधी दिली, तर सर्व ख्रिस्ती आणि इंग्रजाळलेले हिंदु पालक मुलांना इंग्रजीतूनच शिक्षण देणार. त्यामुळे शिक्षणाचे माध्यम सर्वांना एकसारखेच लागू करणे आवश्यक आहे.

कुंकळ्ळी येथील वर्ष १५८३ च्या पोर्तुगिजांच्या विरोधातील उठावावर लघुपट काढा ! – कुंकळ्ळी चिफ्टन मेमोरियल ट्रस्ट

वर्ष १५८३ च्या पोर्तुगिजांच्या विरोधातील उठावावर लघुपट काढल्यास जगभरातील इतिहासतज्ञांना याचा लाभ होईल आणि त्यांना यावर अधिक संशोधन करण्यास साहाय्य होईल.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी वीर सावरकर यांच्या विचारांनी कार्य करायला हवे ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंनी वेळ द्यावा. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्य करायचे असेल, तर प्रथम आपण हिंदु राष्ट्राची संकल्पना समजून घ्यायला हवी. हिंदु राष्ट्र स्थापन करायचे असेल, तर आपणाला वीर सावरकर यांच्या विचारांनी कार्य करायला हवे.

हिंदूंची धर्मावरील श्रद्धा वाढवण्यासाठी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाची आवश्यकता !

भारतियांमधील धर्माविषयी श्रद्धा अल्प होत चालली आहे. आता आपल्याला ही श्रद्धा जागृत करणे अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी अशा अधिवेशनांची फार आवश्यकता आहे. असे काम प्रत्येक ठिकाणी झाले पाहिजे.

सर्व समविचारी संघटनांनी एकत्र येऊन कार्य करावे !

हिंदुजागृतीचे कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी काय काय पावले उचलू शकतो, याचाही निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे हे अधिवेशन अत्यंत योग्य आहे. या अधिवेशनाने नि:संशय उत्तरोत्तर प्रगती करावी, यासाठी आपण भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करूया.

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात एकत्र आलेली शक्ती हिंदु राष्ट्राच्या निर्मितीच्या कार्यात कृतीशील होईल ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

‘हिंदु राष्ट्राची संकल्पना ही आमच्या सनातन धर्मातील वैश्विक संस्कृती आणि विश्वदर्शन यांचे नाव आहे. हिंदू ‘चराचरात ब्रह्म आहे’, असे मानत असल्यामुळे त्याचा उपभोग घेण्याची हिंदूंची संस्कृती नाही. त्यामुळे भारतात हिंदु राष्ट्र स्थापन झाले की, त्याद्वारे विश्वकल्याणाचे कार्य होईल, हा आजपर्यंतचा इतिहास आहे.

साम्यवादी विचारसरणी राष्ट्रहिताला हानीकारक ! – डॉ. एस्.आर्. लीला, माजी आमदार, तथा लेखक, बेंगळुरू, कर्नाटक

साम्यवादी विचारसरणी राष्ट्रहिताला हानीकारक आहे. आपल्याशी सद्भावाने वागणार्‍या व्यक्तीशीच आपण सद्भावाने वागले पाहिजे. दुष्टवृत्तीने वागणार्‍यांपासून सज्जनांचे रक्षण केलेच पाहिजे, ही रामायणाची शिकवण आहे.