काँग्रेस नेते विरियातो, तुम्ही चुकीचेच बोलला !

विरियातो यांचे म्हणणे आणि मांडणी चुकली, यात शंकाच नाही. त्याविषयी त्यांनी स्वतःची भूमिका अधिक स्पष्ट करणे क्रमप्राप्त आहे.

गोवा : केरी येथे पार पडला श्री विजयादुर्गा देवस्थानचा सुवर्ण शिखर कलश प्रतिष्ठापना महोत्सव !

‘दक्षिणाम्नाय श्री शारदा पीठम् शृंगेरी’चे जगद्गुरु श्री श्री विधुशेखर भारती सन्निधानम् स्वामी यांच्या अमृत हस्ते श्री. संजय किर्लोस्कर यांच्या उपस्थितीत हा सुवर्णकलश विधीवत प्रतिष्ठापित करण्यात आला.

PM Modi Goa Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ एप्रिलला गोव्यात !

वर्ष २०१९ मध्ये भाजपला दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ गमवावा लागला होता. या मतदारसंघावर भाजपने आता अधिक लक्ष केंद्रित केले आहे आणि यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे दक्षिण गोव्यात आयोजन करण्यात आले आहे.

गोवा : कला अकादमीतील एका ‘फॉल्स सिलिंग’चा भाग कोसळला !

या घटनेवरून विरोधकांनी सरकारवर टिकेची झोड उठवली आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले, ‘‘भ्रष्टाचारासह निकृष्ट दर्जाची कामे, हे भाजपच्या विकसित भारताचे ‘मॉडेल’ आहे.’’

GOA OCI Card Issue : ‘ओ.सी.आय्.’ कार्डसाठी आता भारतीय पारपत्र समर्पण केल्याचे  प्रमाणपत्र पुरेसे

‘ओ.सी.आय्.’ कार्ड मिळवण्यासाठी आता पर्यायी कागदपत्र म्हणून पारपत्र समर्पण केल्याचे प्रमाणपत्र पुरेसे असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. याचा सहस्रो गोमंतकीय आणि त्यांचे कुटुंबीय यांना लाभ मिळणार आहे.

PM MODI : ख्रिस्ती समाजाच्या सहकार्यानेच गोव्यात भाजपचे सरकार ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘ख्रिस्ती समाज भाजपला पाठिंबा देत नाही’, असे म्हणता येणार नाही; मात्र भाजपला यासाठी अधिक काम करण्याची आवश्यकता आहे आणि ते काम आम्ही करत आहोत, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

Goa DMC College Exams :उपस्थिती अल्प असल्याने आसगाव येथील ‘डी.एम्.सी.’ महाविद्यालयाचे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित !

अनुपस्थित विद्यार्थ्यांची बाजू घेऊन विद्यार्थी संघटना चुकीचा पायंडा पाडत आहेत. इतर विद्यार्थीही असेच करतील. मग महाविद्यालयाच्या नियमांना काय अर्थ रहाणार ?

Goa Unseasonal Rains : उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या गोमंतकियांना पावसामुळे दिलासा

या पावसामुळे काही ठिकाणी झाडे कोसळणे, गटारे तुंबणे, माती वाहून जाणे, छप्पर उडून जाणे, असे प्रकार घडले. यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबली. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी तुंबले होते.

Goa Lineman Death : डिचोली (गोवा) येथे वीज कर्मचार्‍याचा विजेचा धक्का बसून मृत्यू

एका फिटनेस कारखान्याचा इनव्हर्टर चालू झाल्यामुळे त्याचा वीजप्रवाह वीज कर्मचारी काम करत असलेल्या ठिकाणापर्यंत आला. त्यामुळेच वीज कर्मचार्‍याचा मृत्यू झाला, असे स्पष्टीकरण चौकशीअंती वीज खात्याच्या मुख्य अभियंत्यांनी दिले आहे.

गोवा : बांधकामाचे ठिकाण रहाण्यास अयोग्य असल्यावरून गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडून कारवाई

बाल हक्क संरक्षण आयोग गंभीर घटना घडल्यावर पहाणी करण्याऐवजी आधीच बांधकामाच्या ठिकाणाची पहाणी करू शकत नाही का ? एका ५ वर्षीय मुलीने जीव गमावल्यावर जागे होऊन काय उपयोग ?