२ भावांना अटक, मोठा भाऊ फरार

मुंबई – दक्षिण मुंबईत शिकवणीवर्ग चालवणार्या ३ भावांकडून १५ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. २ भावांना पोलिसांनी अटक केली आहे, तर मोठा भाऊ अद्याप फरार आहे. समुपदेशनाच्या वेळी मुलीने उलगडा केला आहे. बाल विकास केंद्राच्या अधिकार्यांकडून पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तिन्ही भावांचे वय अनुक्रमे २४, २५ आणि २७ असे आहे. वर्ष २०२२ पासून शिकवणीवर्गात मुलीवर अत्याचार केला जात होता. अपकीर्तीच्या भीतीपोटी मुलगी घरी आईला काही सांगत नव्हती.
पीडित मुलीच्या आईचा घटस्फोट झाला होता. नियमित अत्याचारामुळे मुलगी धक्क्यात गेली होती. ती कुणाशी बोलत नव्हती. तिच्या आईने मुलीला बाल विकास केंद्रामध्ये पाठवले होते. मुलीला विश्वासात घेतल्यानंतर तिने याविषयी सांगितले. मुलीची आई आणि मुलगी तक्रार प्रविष्ट करण्यास घाबरत होते. त्यामुळे बालविकास केंद्राकडूनच तक्रार प्रविष्ट करण्यात आली. शिकवणीवर्गातील अन्य मुलींवरही अशा प्रकारे अत्याचार होत आहे का ? याची चौकशी करण्यात येत आहे.
संपादकीय भूमिका :
|
बनावट औषधे आणि इंजेक्शने विकणार्यांवर कारवाई होत नसल्याने सदस्य संतप्त !
कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित उपकरणांच्या अपवापराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार कायदा करणार !
‘गाय आम्हाला कुराणाप्रमाणे पवित्र, हत्या करणार्यांवर कारवाई करावी’ – आमदार अबू आझमी
कर्नाटकात दोन वेगवेगळ्या घटनांत धर्मांध मुसलमानांकडून २ हिंदु तरुणींची हत्या
मुंबईत ६ हॉटेलसह बेकरी आणि क्लब यांचे परवाने निलंबित : १९ जणांना अटक !
आश्वासनांची पूर्तता गतीने होण्यासाठी महाराष्ट्र विधीमंडळ करणार ‘सॉफ्टवेअर’ची निर्मिती !