गोव्यात पुढील ४८ घंट्यांत मोसमी पावसाच्या आगमनासाठी हवामान अनुकूल

गोवा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने जनतेला न घाबरण्याचे, होड्यांमधून किनारी भागात न जाण्याचे अन् सर्व सागरी क्रीडा बंद करण्याचे, तसेच ०८३२२४१९५५०, ०८३२२२२५३८३, ०८३२२७९४१०० या आपत्कालीन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

लहान मुलांवरील अत्याचारांत वाढ !

गोवा राज्यात मागील ९ वर्षे सरासरी प्रत्येक आठवड्याला ५ महिला आणि लहान मुले अत्याचाराला बळी पडल्या आहेत. पीडितांवर लैंगिक आणि शारीरिक अत्याचार करण्यात आले, तसेच त्यांच्या विरोधात अपशब्द वापरण्यात आले……

उष्णता वाढीमुळे गोव्यात आज शाळा बंद ठेवण्याचा शासनाचा आदेश

गोवा राज्यात पावसाला झालेला विलंब आणि त्यासह झालेली उष्णता वाढ यांमुळे शासनाच्या शिक्षण खात्याने एका आदेशाद्वारे १० जून या दिवशी शाळा अन् उच्च माध्यमिक विद्यालये यांना सुट्टी घोषित केली आहे.

गोवा : उद्ध्वस्त मंदिरांच्या पुनर्बांधणीसंबंधीचा अहवाल सुपुर्द करण्यासाठीच्या मुदतीत ३१ डिसेंबरपर्यंत वाढ

पुरातत्व विभागाच्या कागदपत्रांमध्ये ८०० ते १ सहस्र मंदिरे पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केल्याची माहिती आहे. त्यांनी केलेल्या पंचनाम्यामध्ये तोडण्यात आलेल्या सर्व मंदिरांची माहिती आहे. या सर्व कागदपत्रांचा अभ्यास करावा लागणार आहे.

९ राज्‍ये आणि ४ केंद्रशासित प्रदेश येथे अल्‍प पाऊस पडणार !

महाराष्‍ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, केरळ, तमिळनाडू, ओडिशा, बंगाल या राज्‍यांसह इतर ४ केंद्रशासित प्रदेशांमध्‍ये या वर्षी अल्‍प पाऊस होण्‍याची शक्‍यता हवामान तज्ञांनी वर्तवली

केरळमध्ये मोसमी पावसाला प्रारंभ

अरबी समुद्रातील ‘बिपरजॉय’ वादळाने मोसमी पावसाचा मार्ग अडवला होता. आता हे वादळ पाकिस्तानच्या दिशेने गेल्यामुळे केरळमधील मोसमी पावसाचा मार्ग मोकळा झाला आहे.

गोवा : अतीवेगवान चारचाकी वाहनाच्या धडकेने ३ वाहनांची हानी

रस्त्याच्या कडेला असलेल्या भ्रमणध्वनी मनोर्‍याला धडकण्यापूर्वी या वाहनाने आणखी २ वाहनांचीही हानी केली. सर्व घायाळांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

गोव्यात प्रतिदिन होतो किमान एक जीवघेणा अपघात !

‘वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी दंड अधिक प्रमाणात आकारण्यात येऊनही अपघात थांबलेले नाहीत. नागरिकांना रस्ता सुरक्षेसंबंधी शिक्षण देण्याची आज आवश्यकता आहे’ – पोलीस महासंचालक जसपाल सिंह

गोवा : कोकण रेल्वे महिला पोलिसांनी रेल्वेस्थानकावर सापडलेली बॅग केरळच्या विद्यार्थिनीला केली परत !

कोकण रेल्वेच्या मडगाव स्थानकावर सापडलेली ४० सहस्र रुपयांचा ऐवज असलेली बॅग २ महिला पोलिसांनी प्रामाणिकपणे केरळ येथील विद्यार्थिनीला परत केली. त्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

‘डार्क वेब’ अमली पदार्थांचे जाळे गोव्यापर्यंत

गोव्यापर्यंत ‘डार्क वेब’द्वारे पोचलेले अमली पदार्थांचे जाळे म्हणजे पोलिसांसमोर एक आव्हान आहे. ही टोळी अमली पदार्थांची तस्करी कुरियर आणि टपाल सेवेतून करत होती. सामाजिक माध्यमांचा वापर करून ‘डार्कवेब’द्वारे तस्करी करण्यात येत होती.