तलवार घेऊन तरुणाला जिवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तरुणावर गुन्हा नोंद !

कल्याण येथील घटना !

प्रतिकात्मक चित्र

कल्याण – कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली भागात एका तरुणाने तलवार हातात घेऊन एका तरुणाचा पाठलाग केला आणि त्याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना सीसीटीव्हीच्या माध्यमातून उघड झाली आहे. या प्रकरणी आर्यन पाटील आणि त्याच्या ४ साथीदारांविरुद्ध खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रारदार सत्कार भोईर याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला. सत्कार भोईर हा तरुण आक्रमणातून थोडक्यात बचावला आहे.

१. आर्यन पाटील याने एका वाहनाला धडक देऊन वाहनातील प्रवाशांना घायाळ केले होते. या प्रकरणी तक्रार प्रविष्ट झाल्यावर साक्षीदार म्हणून सत्कार भोईर याने आर्यन पाटीलसह त्याच्या इतर साथीदारांची नावे पोलिसांना सांगितली होती.

२. आर्यनच्या मनात सत्कारविषयी राग होता. त्याच्यावर पाळत ठेवून त्याला आर्यनने मारण्याचा प्रयत्न केला.

आर्यनने तलवार कुठून आणली, याचेही अन्वेषण पोलीस करत आहेत.

संपादकीय भूमिका :

कायदा-सुव्यवस्थेचा धाक संपल्याचे लक्षण !