भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत गोहत्याबंदी आणि लव्ह जिहादविरोधी विधेयक यांची मागणी !
गोहत्या बंदी विधेयक आणि लव्ह जिहादविरोधी विधेयक लवकरात लवकरात विधीमंडळात मांडावे, अशी मागणी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत ६ डिसेंबर या दिवशी करण्यात आली.
गोहत्या बंदी विधेयक आणि लव्ह जिहादविरोधी विधेयक लवकरात लवकरात विधीमंडळात मांडावे, अशी मागणी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत ६ डिसेंबर या दिवशी करण्यात आली.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत एकूण २ लक्ष ४१ सहस्र ९०८ एवढे मतदान झाले. त्यापैकी २३ सहस्र ९२ मते अवैध होती, म्हणजेच झालेल्या एकूण मतदानाच्या जवळपास १० टक्के मतदान अवैध ठरले.
भारतीय राजकारणाने किती खालचा स्तर गाठला आहे, ते मोजण्यासाठी कोणतीही फूटपट्टी नाही. नीतीमत्ता, आर्थिक अपहार, विरोधकांवर केलेल्या कुरघोड्या, स्वतःचे वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी केलेली कटकारस्थाने यांची कोणतीही लिखित नोंद नसेल, एवढे प्रसंग जनतेलाच ठाऊक असतील.
राज्यात जिल्हा पंचायत निवडणूक शनिवार, १२ डिसेंबर, तर मतमोजणी १४ डिसेंबर या दिवशी होणार आहे. गोवा राज्य निवडणूक आयुक्त चोखा राम गर्ग यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
भाग्यनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. सर्वाधिक ५५ जागा तेलंगाणा राष्ट्र समितीला मिळाल्या आहेत, तर दुसर्या क्रमांकावर असलेल्या भाजपला ४८ जागा आणि तिसरा क्रमांक मिळालेल्या एम्.आय.एम्. ला ४४ जागा मिळाल्या आहेत.
डिसेंबर मासातच राज्यात जिल्हा पंचायत निवडणूक होणार आहे. राज्य निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी निवडणुकीचा दिनांक घोषित करेल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
योग्य पद्धतीने मतदानही करू न शकणार्या मतदारांना शिक्षित म्हणायचे का ?
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीत पुणे, नागपूर आणि संभाजीनगर मतदार संघात भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. संभाजीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांचा पराभव केला आहे.
धुळे विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार मतदारसंघात भाजपचे अमरीशभाई पटेल विजयी झाले आहेत. पटेल हे माजी शालेय शिक्षणमंत्री आहेत. निवडणुकीत ४३७ पैकी ४३४ जणांनी मतदान केले होते.
भारतीय जनता पक्षाची विशेष राज्य कार्यकारिणी सभा ५ डिसेंबर या दिवशी बेळगाव शहरात होत आहे.