भाजपची विशेष राज्य कार्यकारिणी सभा ५ डिसेंबर या दिवशी बेळगावात

बेळगाव – भारतीय जनता पक्षाची विशेष राज्य कार्यकारिणी सभा ५ डिसेंबर या दिवशी बेळगाव शहरात होत आहे. तत्पूर्वी ४ डिसेंबर या दिवशी कोअर कमिटीची सभा होईल. यात पक्षाचे राष्ट्रीय मुख्य सचिव अरुण सिंग उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती पक्षाचे राज्य उपाध्यक्ष निर्मलकुमार सुराणा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सुराणा पुढे म्हणाले, कॉलेज रोडवरील गांधी भवन येथे होणार्‍या राज्य कार्यकारिणी सभेला ५८३ जण अपेक्षित असून त्यांपैकी १४९ जण प्रत्यक्षात सभेस उपस्थित रहाणार आहेत. उर्वरित ४३४ जण ऑनलाईन द्वारे भाग घेणार आहेत. या सभेस मुख्यमंत्री बी.एस्. येडियुरप्पा यांसह अन्य मार्गदर्शन करणार आहेत. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची सिद्धता पक्षाकडून चालू आहे.