Dhaka Poila Baisakh Event Renamed : बांगलादेशाने बंगाली नववर्षाच्या मिरवणुकीचे हिंदु नाव पालटले !

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशाने बंगाली नववर्षासाठी ‘युनेस्को’ने (‘युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफीक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन’ने – संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेने) मान्यता दिलेल्या मिरवणुकीचे नाव आणि लिखाण पालटण्याचा निर्णय घेतला आहे.

अनेक राजकीय पक्ष आणि इस्लामी कट्टरतावादी संघटना आधीच या पालटाची मागणी करत होत्या. मिरवणुकीचे नाव आणि आशय हिंदु संस्कृतीशी मिळताजुळता असल्याने ही हिंदुद्वेषी मागणी करण्यात येत होती. बांगलादेश १४ एप्रिल या दिवशी ‘बंगाली नववर्ष १४३२’ साजरे करणार आहे. याला ‘पोहेला बैशाख’ म्हणून ओळखले जाते. बंगाली नववर्ष मिरवणूक ‘मंगला शोभा यात्रा’चे नाव पालटून ‘वर्षावरण आनंद शोभा यात्रा’ असे ठेवण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

बांगलादेशात सातत्याने हिंदुद्वेषी कृत्ये चालू असतांना भारताची निष्क्रीयता लज्जास्पद !