बांगलादेशाचे सैन्यदलप्रमुख रशियाला गेले असतांना झाली कारवाई

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात गेल्या वर्षी झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या वेळी महत्त्वाची भूमिका बजावल्यावरून ५ सैनिकी अधिकार्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. यात २ ब्रिगेडियर, १ कर्नल, १ लेफ्टनंट कर्नल आणि १ मेजर यांचा समावेश आहे. बांगलादेशाचे सैन्यदलप्रमुख जनरल वकार उझ जमान रशियाच्या दौर्यावर असतांना सैन्याधिकार्यांना नजरबंद करण्यात आले आहे. ५ एप्रिल या दिवशी सैन्याधिकार्यांना त्यांच्या अधिकृत निवासस्थानातच बंदी म्हणून ठेवण्यात आले. बांगलादेशाच्या अंतरिम सरकारने या अधिकार्यांची ओळख सार्वजनिक केलेली नाही.
या सर्व अधिकार्यांवर २४ घंटे लक्ष ठेवण्यात येत असून त्यांना सर्व दायित्वांपासून मुक्त करण्यात आले आहे. त्यांना देश सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.