नागभूमीमध्ये (नागालँडमध्ये) साधूंना प्रतिबंध करणारा ‘नेहरू-एल्विन’ राष्ट्रघातकी करार मोडित काढणे आवश्यक !
‘विदेशातून विविध धर्मांचे लोक हिंदुस्थानात येतात. ‘हिंदुस्थानातील वनवासी क्षेत्रातील लोकांच्या जीवनाचा अभ्यास करण्याच्या हेतूने आपण आलो आहोत’, असे भासवले जाते. ‘या अभ्यासकांचा अंत:स्थ हेतू अभ्यास करण्याचा नसून वनवासी भागांतील जनतेचे धर्मांतर करणे’, हा असतो. असाच हेतू मनात ठेवून वर्ष १९२७ मध्ये मानवशास्त्री वेरियर एल्विन हिंदुस्थानात आला.