Maulana On WaqfBoard Powers : (म्‍हणे) ‘मुसलमानांना रस्‍त्‍यावर यावे लागेल !’ – मौलाना साजिद रशिदी

वक्‍फ बोर्डाच्‍या अधिकारांवर निर्बंध आणण्‍याच्‍या विधेयकावर मौलाना साजिद रशिदी यांची टीका

(मौलाना म्‍हणजे इस्‍लामचा अभ्‍यासक)

मौलाना साजिद रशिदी

नवी देहली – शेतकर्‍यांनी आंदोलन केले आणि त्‍यात ते हुतात्‍मा झाले. त्‍यामुळे केंद्र सरकारला ३ कृषी कायदे मागे घेतले. त्‍याचप्रमाणे आता मुसलमानांना रस्‍त्‍यावर येऊन त्‍यांच्‍या हक्‍कांसाठी घटनात्‍मक लढा द्यावा लागेल, असे आवाहन ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्‍यक्ष मौलाना साजिद रशिदी यांनी वक्‍फ बोर्ड सुधारणा विधेयकावर विधान केले आहे.

मौलाना राशिदी पुढे म्‍हणाले की,

१. वक्‍फ समजून घेणे महत्त्वाचे आहे. ते आमच्‍या भल्‍यासाठी आहे आणि सरकारने घटनात्‍मकदृष्‍ट्या आम्‍हाला वक्‍फचा अधिकार दिला आहे. सध्‍या मुसलमान गप्‍प आहेत. आमच्‍या अनेक मालमत्ता सध्‍या राज्‍य सरकारच्‍या मालकीच्‍या आहेत. केंद्र सरकारला भीती आहे की, जर मुसलमान त्‍यांच्‍या हक्‍कांची मागणी करू लागले, तर मुसलमान जागे होतील.

२. मोदी सरकार स्‍थापन झाल्‍यापासून ते केवळ मुसलमानांना लक्ष्य करण्‍यासाठी विधेयक आणत आहे. महागाई आणि रोजगार यांवर कोणतीही चर्चा होत नाही. ज्‍या हिंदूंनी भाजपला मतदान केले आहे त्‍यांनीही विचार करावा. हे सरकार आमचे काय करणार आहे ? देशात पुन्‍हा फाळणी होईल, असे वातावरण भाजप देशात निर्माण करत आहे. (हिंदूंनो, धर्मांधांची धमकी लक्षात घ्‍या ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

वक्‍फ बोर्डाचा कायदा ‘माझे ते माझे आणि तुझे तेही माझे’ असा आहे आणि त्‍याला मुसलमान संघटना पाठिंबा देत आहेत. अशा संघटनांवर बंदी घालून त्‍यांच्‍या नेत्‍यांना कारागृहात डांबण्‍याची आता वेळ आली आहे !