प्रशांत कोरटकर यांना जिल्हा न्यायालयाकडून जामीन संमत !

प्रशांत कोरटकर

कोल्हापूर, ९ एप्रिल – येथील इंद्रजित सावंत यांना दूरभाष करून धमकी दिल्याचा आरोप असलेले नागपूर येथील प्रशांत कोरटकर यांना कोल्हापूर पोलिसांनी २५ मार्चला अटक केली होती. यानंतर ४ दिवस पोलीस कोठडी मिळाल्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर कोरटकर यांनी जामिनासाठी आवेदन प्रविष्ट केले होते.

यावर दोन्ही बाजूंनी युक्तीवाद पूर्ण झाल्यावर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकर यांनी जामीन संमत केला आहे.