आळंदी (जिल्हा पुणे) – श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मवर्षानिमित्त (सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव) श्री क्षेत्र आळंदी देवाची येथे भव्य ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ३ ते १३ मे या कालावधीत हा ‘सामूहिक पारायण सोहळा’ होणार आहे. ‘श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी’ आणि समस्त आळंदी ग्रामस्थांनी महाराष्ट्रातील भाविकांना या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊन माऊलींच्या जन्मोत्सवाचा आनंद लुटण्याचे सस्नेह निमंत्रण दिले आहे. पारायणात सहभागी होऊ इच्छिणार्या भाविकांनी स्वत:चे नाव नोंदणीसाठी ७०२०६ ५६८०९ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.