ग्रामीण भागातील सर्व शाळांमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी देण्याचे नियोजन चालू ! – दादा भुसे, शालेय शिक्षणमंत्री

मोहन मते यांच्यासह ७ सदस्यांनी ‘नागपूर जिल्ह्यातील ३ सहस्र ९७५ शाळांपैकी १ सहस्र २५८ शाळांत विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध नाही’, यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

सांगली शहरातील अनधिकृत फ्लेक्स छापणार्‍या मुद्रणालयावर महापालिकेकडून कठोर कारवाई !

महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी शहरातील अनधिकृत व्यवसायाची नोंद घेऊन जागेवर जाऊन ही कारवाई केली आहे.

उरुळीकांचन (पुणे जिल्हा) येथे गोरक्षकांना जिवे मारण्याची धमकी

हिंदुत्वनिष्ठ सरकार असतांना अद्यापही गोवंशियांची तस्करी न थांबणे यासारखे दुर्दैव दुसरे कुठले ? गोतस्करांना पोलिसांचा धाक नाही, हेच यावरून वारंवर सिद्ध होते.  छत्रपती शिवरायांच्या राज्याप्रमाणे गोतस्करांना शिक्षा होणे अपेक्षित आहे !

पंत वालावलकर रुग्णालयात आंतरराष्ट्रीय दर्जाचे अस्थिरोगतज्ञ डॉ. आर्यन गुणे सेवा देणार !

या प्रसंगी डॉ. आर्यन गुणे म्हणाले, ‘‘आपण पारंपरिक शिक्षणासमवेत ‘ट्रामा केअर’ विभागातील आधुनिक पद्धतीच्या आणि रुग्णास अल्प शारीरिक त्रास  होणार्‍या उपचारपद्धती या रुग्णालयात वापरून रुग्णांना चांगल्या सुविधा देऊ.’’

Maharashtra Budget 2025 : १ लाख ३६ सहस्र २३५ कोटी रुपयांच्या तुटीचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर !

मागील अर्थसंकल्पाच्या, तसेच अन्य राज्यांच्या तुलनेत ७ लाख २० कोटी रुपये इतके भव्य आकारमान असलेला; परंतु तब्बल १ लाख ३६ सहस्र २३५ कोटी रुपयांच्या राजकोषीय तुटीचा महाराष्ट्राचा वर्ष २०२५-२०२६ चा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी १० मार्च या दिवशी विधानसभेत सादर केला.

जेजुरी गडावर भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू !

महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्‍या खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर येणार्‍या भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. हा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे. ट्रस्टने त्याची नियमावलीही घोषित केली आहे.

संगमनेर (अहिल्यानगर) येथील मंदिरातून दागिन्यांसह ५० लाख रुपयांची चोरी !

तालुक्यातील तळेगाव दिघे परिसरात नान्नज दुमाला या गावाजवळील काकडवाडी येथील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरातून ९ मार्चला देवीच्या ५० तोळे सोन्याच्या आणि अडीच किलो चांदीच्या दागिन्यांसह ५० लाख रुपयांची चोरी झाली.

Devendra Fadnavis On Team India : चॅम्पियन्स चषक स्पर्धेत विजय मिळवलेल्या भारताच्या संघाचा अभिनंदन प्रस्ताव विधानसभेत मान्य !

९ मार्च या दिवशी भारतीय क्रिकेट संघाने दुबई येथे झालेल्या चॅम्पियन्स चषक स्पर्धेत न्यूझीलंड संघाला पराभूत करून तिसर्‍यांदा चषक जिंकला. याविषयी विधानसभेत ‘अभिनंदन’ प्रस्ताव मान्य करण्यात आला.

Air India Bomb Threat : ‘एअर इंडिया’चे विमान बाँबने उडवून देण्याची धमकी !

विमानात बाँबच्या वाढत्या धमक्या पहाता संबंधितांना अटक करून कठोर शिक्षा व्हायला हवी !

Chhatrapati Shivaji Maharaj Mandir : भिवंडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराचे १४ मार्चला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण !

छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार, धोरण, पराक्रम आणि दैदिप्यमान इतिहास जगासमोर मांडण्यासाठी भिवंडी येथील मराडे पाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर उभारण्यात आले आहे.