हिंदूबहुल भारतात हिंदूंची मंदिरे असुरक्षित असणे संतापजनक !
संगमनेर (जिल्हा अहिल्यानगर) – तालुक्यातील तळेगाव दिघे परिसरात नान्नज दुमाला या गावाजवळील काकडवाडी येथील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरातून ९ मार्चला देवीच्या ५० तोळे सोन्याच्या आणि अडीच किलो चांदीच्या दागिन्यांसह ५० लाख रुपयांची चोरी झाली. चोरांनी ‘सी.सी.टी.व्ही.’चा ‘डी.व्ही.आर्.’ही चोरून नेला. (डी.व्ही.आर्. म्हणजे डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर. हे उपकरण सी.सी.टी.व्ही.ने मुद्रित केलेले व्हिडिओ संरक्षित करून ठेवते.) पोलिसांनी तातडीने घटनास्थळाची पहाणी केली असून ठसेतज्ञ आणि श्वानपथक यांद्वारे चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चोरीचे लवकरात लवकर अन्वेषण करावे, अशी मागणी काकडवाडीचे माजी सरपंच जनार्दन कासार आणि ग्रामस्थ यांनी केली आहे.