शिबिराच्या वेळी त्रास होत असतांना साधकाने ‘त्याचे शरीर, म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा रथ आहे’, असा भाव ठेवल्यावर त्याला हलकेपणा जाणवणे

शिबिरात एका साधकाने सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचा संदेश वाचून दाखवला, ‘ही रणभूमी आहे. येथे सूक्ष्म युद्ध चालू आहे.’ ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी तसा भाव माझ्यात आधीच निर्माण केला’, त्याबद्दल मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.

वाशी (नवी मुंबई) येथील सौ. शिल्पा श्रीराम बोरसे यांनी प.पू. डॉक्टरांच्या अनमोल सहवासात अनुभवलेले अविस्मरणीय क्षण !

‘मला प.पू. डॉक्टर आणि कुंदाताई यांचा सहवास लाभला’, यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. आज इतक्या वर्षांनीही मला कोणतीही समस्या भेडसावू लागली की, ‘आता प.पू. डॉक्टर काय म्हणाले असते ?’, हे मला आठवते. मला सूक्ष्मातून त्यांचा आवाज ऐकू येतो. त्यांच्या कृपेमुळे आतापर्यंत सगळे व्यवस्थित चालू आहे.

कर्नाटक कळसा-भंडुरा नाल्‍यांचे पाणी वळवण्‍याच्‍या सिद्धतेत

कर्नाटकने कळसा-भंडुरा प्रकल्‍पांच्‍या माध्‍यमातून म्‍हादईच्‍या पात्रातून ३.९ टी.एम्.सी. (‘टी.एम्.सी.’ म्‍हणजे ‘थाऊजंड मिलियन क्‍युबिक फिट’ – अंदाजे १०० अब्‍ज लिटर) पाणी वळवण्‍यासाठी अर्थसंकल्‍पात प्रावधान केले आहे.

‘भाव तेथे देव’ याची प्रचीती घेणार्‍या डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील सौ. कपिला घाणेकर ! 

जगन्नाथपुरी येथे जाण्याची इच्छा होणे; मात्र प्रत्येक वेळी काहीतरी अडचणी येऊन जाणे रहित होणे आणि त्या वेळी सकारात्मक राहू शकणे

चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जेने भारलेला, तसेच शांतता, दिव्यता अन् आत्मशुद्धी यांची दिव्य अनुभूती देणारा रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम !

आश्रमातील साधक, संत आणि प्रबोधन करणारे साधक यांचे चेहरे सात्त्विक आणि आनंदी जाणवले. त्यांच्या जीवनशैलीत सात्त्विकता आणि भक्ती सहजतेने प्रकट होत होती. जर तुम्हाला नि:स्वार्थ सेवा, सात्त्विक जीवनशैली आणि आध्यात्मिक उन्नती यांचा अनुभव घ्यायचा असेल, तर एकदा तरी या आश्रमाला भेट द्या.

मुलीला आध्यात्मिक दृष्टीकोन देऊन साधना करण्यासाठी प्रोत्साहन देणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या बडोदा येथील ९० वर्षे वयाच्या श्रीमती शालिनी फाटक !

माझ्या मामेभावाच्या मुलाचे लग्न २२.१२.२०२४ या दिवशी पुणे येथे होते; मात्र गुजराती ग्रंथांशी संबंधित तातडीची सेवा आल्याने मी लग्नाला जायचे रहित केले. मी याविषयी माझ्या आईला सांगितले. तेव्हा ती मला म्हणाली, ‘‘लग्न होतच रहातील; परंतु तुला जी गुरुसेवेची संधी मिळाली आहे, ती पुन्हा केव्हा मिळणार ? तू योग्य निर्णय घेतला आहेस.’’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना चित्तशुद्धी करण्यासाठी स्वयंसूचना देण्याच्या सुलभ पद्धती शिकवणे आणि त्याची साधकाला आलेली अनुभूती

मी अनुमाने वर्षभरापूर्वी माझ्या मनातील अयोग्य विचार नष्ट होण्यासाठी स्वयंसूचना दिल्या होत्या. नंतर एकदा माझ्या मनात पुन्हा पूर्वीप्रमाणेच अयोग्य विचार आले. त्याच क्षणी मला पूर्वी मी याविषयी दिलेल्या स्वयंसूचनांचे अकस्मात् स्मरण झाले आणि मनात अयोग्य विचार येण्याचे थांबले.

देवस्थानांच्या भूमी हडपणार्‍या भूमाफियांना रोखण्यासाठी महाराष्ट्रात ‘अँटी लँड ग्रॅबिंग’ ॲक्ट लागू करा ! – सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ

अमरावतीसह विदर्भातील अनेक सार्वजनिक मंदिर ट्रस्टच्या भूमी काही महसूल अधिकारी, बिल्डर लॉबी यांच्याशी संगनमत करून हडपण्यात आलेल्या आहेत. या विरोधात महाराष्ट्र शासनाने तात्काळ ‘अँटी लँड ग्रॅबिंग’ (भूमी चोरी प्रतिबंध) कायदा करावा.

एन्.एम्.एम्.टी.च्या महिलांसाठीच्या बसगाड्या बंद !

नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या वतीने (एन्.एम्.एम्.टी.) महिलांसाठीची तेजस्विनी बससुविधा वर्षभरापासून बंद पडली आहे.  ही बस सेवा पुन्हा चालू करावी, अशी मागणी महिला करत आहेत.