पंत वालावलकर रुग्णालयात आंतरराष्ट्रीय दर्जाचे अस्थिरोगतज्ञ डॉ. आर्यन गुणे सेवा देणार !

श्री. संतोष कुलकर्णी आणि डॉ. आर्यन गुणे (उजवीकडे)

कोल्हापूर – तब्बल ३ पिढ्या सर्वसामान्य जनतेला परवडणार्‍या दरामध्ये  विविध वैद्यकीय सेवा सुविधा पुरवणार्‍या शिवाजी उद्यम नगरातील पंत वालावलकर रुग्णालयात आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे अस्थिरोगतज्ञ डॉ. आर्यन गुणे सेवा देणार आहेत, अशी माहिती वालावलकर रुग्णालयाचे प्रमुख संचालक संतोष कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी डॉ. आर्यन गुणे म्हणाले, ‘‘आपण पारंपरिक शिक्षणासमवेत ‘ट्रामा केअर’ विभागातील आधुनिक पद्धतीच्या आणि रुग्णास अल्प शारीरिक त्रास  होणार्‍या उपचारपद्धती या रुग्णालयात वापरून रुग्णांना चांगल्या सुविधा देऊ.’’