Air India Bomb Threat : ‘एअर इंडिया’चे विमान बाँबने उडवून देण्याची धमकी !

  • न्यूयॉर्कला जाणारे विमान पुन्हा मुंबई विमानतळावर उतरवले

  • विमानात ३२० हून अधिक प्रवासी

मुंबई – मुंबईहून न्यूयॉर्कला जाणारे ‘एअर इंडिया’चे विमान बाँबने उडवून देण्याची धमकी मिळाल्यावर विमान पुन्हा मुंबई विमानतळावर सुरक्षितरित्या उतरवण्यात आले. यात ३२० हून अधिक प्रवासी होते. सुरक्षायंत्रणांकडून विमानाची पडताळणी करण्यात आली. मुंबई-न्यूयॉर्क विमान प्रवासात ‘एआय ११९’ या विमानाच्या संदर्भात हा प्रकार घडला. विमानाच्या शौचालयात धमकी असलेली चिठ्ठी आढळून आली.

आता ११ मार्च या दिवशी पहाटे ५ वाजता हे विमान पुन्हा उड्डाण करेल. तोपर्यंत सर्व प्रवाशांची हॉटेलमध्ये भोजनासह रहाण्याची व्यवस्था करण्यात येईल, तसेच त्यांना इतर सर्व साहाय्यही करण्यात येईल.

संपादकीय भूमिका

विमानात बाँबच्या वाढत्या धमक्या पहाता संबंधितांना अटक करून कठोर शिक्षा व्हायला हवी !