मंदिरातील घंटा चोरी प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला अटक !
सुपे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंदिरातील पितळ धातूच्या समई आणि घंटा चोरणार्या एका अल्पवयीन मुलाला सुपे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ३१ सहस्र ५०० रुपयांच्या ११ घंटा कह्यात घेतल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली.