अनेक वर्षे तक्रार करूनही कारवाई नाही !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथील विधानसभा मार्गावर राणा प्रताप चौकाच्या जवळ एका व्यापारी संकुलाच्या तळघरात शिवमंदिर असून ते मुसलमानाने कह्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे मंदिर ३० वर्षांपासून तळघरात लपवून ठेवण्यात आले आहे, अशी तक्रार करूनही तत्कालीन प्रशासन आणि सरकार यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. या संदर्भात ‘गजराज सिंह मंदिर ट्रस्ट’शी संबंधित लोकांनी लक्ष्मणपुरीचे आयुक्त रोशन जेकब यांची भेट घेतली आहे. त्यानंतर या प्रकरणाची नोंद घेत आयुक्तांनी हे प्रकरण जिल्हाधिकार्यांकडे पाठवले आहे.
१. हिंदु पक्षाकडून दावा करण्यात आला आहे की, हे मंदिर वर्ष १८८५ चे आहे. स्वर्गीय गजराज सिंह यांनी स्वतःच्या कमाईतून त्यांच्या भूमीत ते बांधले होते. वर्ष १९०६ मध्ये नोंदणीकृत मृत्यूपत्र करून त्या जागेवर ठाकूरद्वार आणिव शिवालय बांधण्यात आले. वर्ष १९१८ मध्ये द्वारका प्रसाद दीक्षित यांना पुजारी म्हणून दायित्व देण्यात आले होते आणि ‘त्यांच्या पिढ्यान्पिढ्या येथे पूजा करत रहातील’, असे सांगण्यात आले. त्यांच्या पिढीतील रामकृष्ण दीक्षित पूजा करत असतांना १९९३-९४ मध्ये एका राजकीय पक्षाशी संबंधित नेते डॉ. शाहिद यांनी मंदिर कह्यात घेतले आणि या भूमीवर अवैधरित्या बांधकाम करत इमारत अन् व्यापारी संकुल बांधले.
२. हिंदूंचे म्हणणे आहे की, १४ ऑगस्ट १९९४ या दिवशी मंदिर समितीने कैसरबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. त्यामध्ये मंदिर परिसरात तोडफोड करण्यासह मंदिरातील अष्टधातू राधाकृष्ण मूर्ती, सोन्याचे दागिने आणि इतर अनेक वस्तू चोरीला गेल्याचे म्हटले होते. या प्रकरणात त्या काळात कार्यरत असलेल्या पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. मंदिर समितीशी संबंधित लोकांनी मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना पत्र पाठवून तत्कालीन जिल्हा दंडाधिकार्यांकडे तक्रार केली होती, तरीही सुनावणी झाली नाही.
संपादकीय भूमिकाराज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची नोंद घेऊन कारवाई करण्याचा आदेश द्यावा, असेच हिंदूंना वाटते ! |