राज्यातील सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालयांत साजरा होणार ‘संविधानदिन’ !

मुंबई, २७ डिसेंबर (वार्ता.) – नवीन वर्षात शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरे करण्यात येणार्‍या ४५ दिनांची सूची राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने शासन आदेशद्वारे घोषित केली आहे. यामध्ये २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधानदिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. या दिवशी राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये राज्यघटनेतील उद्देशिकेचे वाचन करण्याची सूचना शासनाकडून देण्यात आली आहे.

शासनाने घोषित केलेल्या दिनविशेषांमध्ये प्रतिवर्षीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनासह ४५ दिनविशेषांचा समावेश आहे.