हिंदु बांधवांचे संघटन व्हावे, या हेतूने आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती बैठक सोरतापवाडी (पुणे) येथे पार पडली !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोरतापवाडी येथील चोरघे लॉन्स येथे १७ डिसेंबर या दिवशी हिंदु राष्ट्र-जागृती बैठक झाली. या बैठकीचा उद्देश गावातील तरुणांना धर्मशिक्षण मिळावे, तसेच सर्व हिंदु बांधवांचे संघटन व्हावे, असा होता.