मुंबई – मुंबईकरांची वाहतूककोंडीतून सुटका करण्यासाठी मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात केबल टॅक्सी (केबलद्वारे वाहतूक करणारे वाहन) चालवण्याचा प्रस्ताव परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडला. पदभार सांभाळल्यानंतर त्यांनी हीच पहिली घोषणा केली.
ते म्हणाले, ‘‘जर आपण १५ आसनी किंवा २० आसनांची केवळ टॅक्सी चालवली, तर वाहतूककोंडीतून सुटका होईल. जर आपण मेट्रो चालवू शकतो, तर केबल टॅक्सी चालवण्यात कोणतीही समस्या नाही. ही प्रणाली महाराष्ट्र परिवहन विभागाच्या अंतर्गत चालायला हवी. त्यामुळे ही प्रणाली योग्य प्रकारे चालेल.’’