पुणे – भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी ३१ डिसेंबर या दिवशी गडांवर धुडगूस घालणार्यांना ‘आपापल्या घरी मेजवानी करा’, अशी चेतावणी दिली आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री गड-दुर्गांवर हुल्लडबाजी केली जाते. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही चेतावणी दिली. अमित गोरखे हे पिंपरी-चिंचवड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. ही छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यभूमी आहे. आता भाजपचे हिंदुत्वनिष्ठ सरकार आहे. त्यामुळे ‘गडांवर धुडगूस घातल्यास शिवप्रेमी धडा शिकवतील’, असेही ते म्हणाले.