आळंदी फाटा (पुणे) येथून बांगलादेशी पती-पत्नीला आतंकवादविरोधी पथकाने केली अटक !

बनावट आधारकार्ड आणि निवडणूक ओळखपत्र सापडले !

पिंपरी (पुणे) – पिंपरी-चिंचवडच्या स्थानिक आतंकवादविरोधी पथकाने आळंदी फाटा येथून बांगलादेशी पती-पत्नीला अटक केली आहे. ते दोघेजण ८ दिवसांपासून एका हॉटेलमध्ये काम करत होते. टिंकू चौधरी आणि खादिजा खातून अशी त्यांची नावे आहेत. दोघांकडे बनावट आधारकार्ड आणि निवडणूक ओळखपत्र सापडले आहे.

आळंदी फाटा येथील एका हॉटेलमध्ये २ बांगलादेशी पती-पत्नी वास्तव्य करत असल्याची माहिती स्थानिक आतंकवादविरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार त्यांच्याकडे चौकशी केली असता ते बांगलादेशी असून घुसखोरी करून त्यांनी भारतामध्ये प्रवेश मिळवला होता, असे लक्षात आले. यापूर्वी २ वर्षांपासून ते दोघेजण भाग्यनगर (हैदराबाद) येथे रहात होते. त्यांच्यावर विविध कलमांद्वारे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

  • गावागावांपर्यंत पोचलेल्या बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढणे आवश्यक आहे !
  • बनावट आधारकार्ड आणि निवडणूक ओळखपत्र कसे काय दिले जाते ? हे शोधून संबंधितांना कठोर शिक्षा देणे आवश्यक आहे !