भेंडवळ (जिल्हा बुलढाणा) येथील ‘घट मांडणी’त यंदा पाऊस बरा असल्याचे भाकीत !
विदर्भातील भेंडवळमध्ये ३५० वर्षांपासून पावसाचे भाकीत करण्याची परंपरा आहे. याला ‘घट मांडणी’ असे म्हणतात. या वेळी जूनमध्ये अल्प पाऊस असेल. जुलैमध्ये सर्वसाधारण, तर ऑगस्टमध्ये भरपूर पाऊस पडेल. सप्टेंबरमध्ये अवकाळीसह बरा पाऊसमान असेल’, असे भाकीत वर्तवण्यात आले आहे.