तुर्भे जनता मार्केट येथे फेरीवाल्यांसह दुकानदारांचे अतिक्रमण !

महानगरपालिका प्रशासनाला हे दिसत कसे नाही ? अतिक्रमण करणार्‍यांवर कारवाई कधी होणार ?

३० मेपासून ठाणे रेल्वेस्थानकावर ६२ घंट्यांचा ब्लॉक !

हा ब्लॉक ३० मे रात्रीपासून चालू होईल. ‘डाऊन फास्ट लाईन’साठी ६२ घंट्यांचा, तर ‘अप स्लो लाईन’वर १२ घंट्यांचा ब्लॉक असणार आहे. येथील रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक ५ आणि ६ यांची रुंदी वाढवण्यासाठी हा ब्लॉक असेल.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : ७८ वर्षीय महिलेवर शेतशिवारात बलात्कार !; १० किंवा ११ जूनला मुंबईत पावसाची शक्यता !…

७८ वर्षीय महिलेवर तिघांनी शेतशिवारात बलात्कार केला असून तिघे जणही फरार आहेत. आरोपींचे वय साधारण ३० ते ३५ वर्षे आहे. अज्ञात आरोपींचा अकोला पोलिसांकडून शोध चालू आहे.

अनियमिततेच्या कारणास्तव लोकायुक्तांची बेळगाव महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागावर धाड !

या संदर्भात पत्रकारांना माहिती देतांना काही नागरिकांनी सांगितले की, सकाळी ७ पासून दाखले घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागतात; मात्र तांत्रिक अडचणींचे कारण देत त्यांना घंटोनघंटे ताटकळत रहावे लागते.

स्वातंत्र्यवीर सावरकर हे अजरामर व्यक्तीमत्त्व ! – आनंद कुलकर्णी, ज्येष्ठ नेते हिंदु महासभा

राजवाडा परिसरातील महिला मंडळाच्या सभागृहात अखिल भारत हिंदु महासभेच्या वतीने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन’ आयोजित केले होते. या संमेलनामध्ये ते उपस्थित हिंदुत्वनिष्ठांना मार्गदर्शन करत होते.

४ शौचकुपांमागे केवळ १ शौचकुप महिलांसाठी ! – प्रजा फाऊंडेशन

‘प्रजा फाऊंडेशन’च्या अहवालातून हे वास्तव उघड झाले; मात्र ते प्रशासनाच्या लक्षात कसे आले नाही ?

डोंबिवलीतील घातक रासायनिक कारखान्यांचे अंबरनाथ येथे स्थलांतर होणार !

स्थलांतराचे काम आचारसंहितेमुळे थांबले होते; मात्र आता उद्योगांना जागा वाटपासाठी निवडणूक आयोगाकडे अनुमती मागितली जाणार आहे.

अपप्रचार खोडून काढण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्याचा कृतीशील प्रसार करणे हाच पर्याय ! – अजय तेलंग, सावरकर साहित्याचे अभ्यासक

‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सांस्कृतिक मंडळा’च्या वतीने सावरकर जयंतीच्या निमित्ताने २८ मे या दिवशी येथील ज्युबिली कन्या शाळेत ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सामाजिक कार्य’ या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते.

बेळ्ळुरू (कर्नाटक) येथे हिंदु युवकावर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमण

कर्नाटकात काँग्रेसचे राज्य म्हणजे पाकिस्तानी राजवट असल्यामुळे धर्मांधांना मोकळीक मिळालेली असल्यानेच अशा घटना सातत्याने घडत आहेत, हे लक्षात घ्या !

कर्नाटकमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचे आढळले मृतदेह !

कर्नाटक राज्यातील कोप्पळ जिल्ह्यातील होसलंगापूर गावात एकाच कुटुंबातील तिघांचा गूढ मृत्यू झाला होता. यामागे धर्मांतर असल्याचा आरोप केला जात आहे. रामेश्‍वरी (वय ५० वर्षे), तिची मुलगी वसंता (वय ३२ वर्षे) आणि नातू साईधर्मतेजा (वय ५ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.