पुणे येथे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाच्या कारच्या धडकेत २ अभियंत्यांचा मृत्यू !

येथे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा वेदांग अग्रवाल याने त्याच्या ईव्ही पोर्शे कारने दुचाकीला धडक दिली. माहिती तंत्रज्ञान अभियंता असलेल्या दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

पुणे शहरात ९ बेकायदेशीर होर्डिंग्जवर कारवाई; धोकादायक ७२ फलकांना नोटिसा !

महापालिका प्रशासनाने नुकतीच शहराच्या कोथरूड, वारजे आणि वानवडी या परिसरांतील ९ बेकायदेशीर होर्डिंग्जवर कारवाई करून ती पाडली.

सांगली येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने २६ मे या दिवशी ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात भव्य मोर्चा !

येथे १९ मे या दिवशी ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात आणि इतर मागण्यांसाठी सकल हिंदु समाज संघटनेच्या वतीने भव्य मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले होते; मात्र काही तांत्रिक आणि इतर कारणांमुळे हा मोर्चा २६ मे या दिवशी…

तरुणीच्या ओढणीवर ज्वलनशील पदार्थ टाकून भ्रमणसंगणकाची चोरी !

येथे रेल्वेस्थानकाजवळ आपल्या मित्राला भ्रमणसंगणक (लॅपटॉप) देण्यास जाणार्‍या तरुणीच्या ओढणीवर दोन अनोळखी तरुणांनी ज्वलनशील पदार्थ फेकला.

शिवसेनेचे उपतालुका प्रमुख विनायक एडके यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढ्याला यश !

महापालिकेतील बनावट नळजोडणी आणि भ्रष्टाचार यांच्या विरोधात सतत पाठपुरावा करून आवाज उठवणारे श्री. विनायक येडके यांचे अभिनंदन !

आज महाराष्ट्रातील १३ मतदारसंघांत ५ व्या टप्प्याचे मतदान !

२० मे या दिवशी लोकसभेच्या ५ व्या टप्प्याचे आणि महाराष्ट्रातील अंतिम टप्प्याचे मतदान मुंबईसह १३ लोकसभा मतदारसंघांत होणार आहे.

‘कॅफे’ संस्कृती त्वरित न थांबवल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू ! – राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड यांची चेतावणी

आमदार अरुण लाड म्हणाले, ‘‘सांगलीत ‘कॅफे’च्या नावाखाली भयानक प्रकार चालू आहे. अल्पवयीन मुलींना आमीष दाखवून त्यांना ‘कॅफे’त नेऊन गैरप्रकार केले जातात. पोलिसांनी पैसे खाल्ले, तर कारवाई कशी होणार ?

सांगली येथील कॅफेमालकांवर गुन्हे नोंद न केल्यास राज्यव्यापी आंदोलन ! – चंदन चव्हाण, राज्यप्रमुख, गुंठेवारी विकास समिती

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून तत्परतेने कारवाई का करत नाही ?

पुणे येथे आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी भाजपच्या माजी नगरसेवकांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद !

सहकारनगर पोलीस ठाण्याच्या परिसरात विनाअनुमती जमाव गोळा करून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, महेश बावळे यांच्यासह २० ते २५ कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

लोणी काळभोर (पुणे) येथे विज्ञापन फलक कोसळल्याच्या प्रकरणी ३ जणांवर गुन्हा नोंद !

या घटनेत वरातीचा घोडा आणि ३ जण घायाळ झाले होते. त्या प्रकरणी जागामालक शरद कामठे आणि ठेकेदार संजय नवले अन् बाळासाहेब शिंदे यांच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.