Kareena Kapoor Pregnancy Bible:स्वतःच्या ‘करीना कपूर प्रेग्नन्सी बायबल’ या पुस्तकाच्या नावातून ख्रिस्त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

अभिनेत्री करीना कपूर खान यांना मध्यप्रदेश उच्च न्यायालयाची नोटीस

जबलपूर (मध्यप्रदेश) – अभिनेत्री करीना कपूर खान यांच्या विरोधात मध्यप्रदेश उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे.  खान यांच्या ‘करीना कपूर प्रेग्नन्सी बायबल’ या पुस्तकातून ख्रिस्ती धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्यावरून जबलपूरचे रहिवासी अधिवक्ता क्रिस्टोफर अँथनी यांनी ही याचिका प्रविष्ट केली आहे. या याचिकेद्वारे करीना यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणी खान यांच्यासह आदिती शाह भीमजियानी, मेझॉन इंडिया, जुगरनॉट बुक्स आणि इतरांना नोटीस बजावली आहे आणि त्यांचे उत्तर मागितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १ जुलै या दिवशी होणार आहे.

याचिकेत म्हटले आहे की, खान यांनी त्यांचे गर्भधारणेच्या वेळचे अनुभव सांगण्यासाठी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. पुस्तकाच्या नावात बायबल जोडल्याने ख्रिस्ती धर्माच्या लोकांना वेदना झाल्या आणि त्यांच्या भावना दुखावल्या. पुस्तकाच्या शीर्षकात बायबलचा उल्लेख आहे. बायबल ख्रिस्ती धर्माच्या अनुयायांचा पवित्र धार्मिक ग्रंथ. त्यामुळे ख्रिस्ती समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. बायबल या पवित्र ग्रंथात परमेश्‍वराची शिकवण आणि बोधकथा आढळतात.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या धार्मिक भावना कुणी दुखावल्या, तर त्याविरोधात न्यायालयात जाऊन हिंदु अधिवक्ते विरोध करण्याच्या घटना दुर्मिळ असतात, हे लक्षात घ्या !