निवृत्त झालेल्या केंद्रीय कर्मचार्यांना औषधांचा पुरवठाच नाही !
केंद्रीय कर्मचार्यांसाठी चालू असलेल्या योजना प्रत्यक्षात कार्यान्वित होतात का, हे प्रशासन कधी पहाणार ?
केंद्रीय कर्मचार्यांसाठी चालू असलेल्या योजना प्रत्यक्षात कार्यान्वित होतात का, हे प्रशासन कधी पहाणार ?
माहीममधील एका परिसरात पूर्ववैमनस्यातून केलेल्या आक्रमणात एक जण घायाळ झाला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. अनिरुद्ध गोड (वय ३२ वर्षे) आणि त्याचा मित्र योगेंद्र पारखे या दोघांवर संकेत साठे अन् त्याचे साथीदार यांनी आक्रमण केले.
मुंबई विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांत यंदापासून पदवी अभ्यासक्रमांसाठी ६०-४० गुणांकन पद्धत लागू होणार आहे. पदवी स्तरावरील बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. आणि इतर सर्व पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांचे ६०-४० याप्रमाणे मूल्यांकन होईल.
शहराला पाणीपुरवठा करणार्या धरणांमधील पाणीसाठा न्यून असल्याने महापालिकेने बांधकामांसाठी प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरणे सक्तीचे केले आहे; मात्र शहरातील केवळ आठच मोठ्या प्रकल्पांसाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर होत असल्याचे समोर आले आहे.
जोगेश्वरी येथील वीरेंद्र खाडे त्यांच्या पत्नीसह वसई येथे मांडवी एक्सप्रेस ही गोव्याला येणारी रेल्वे पकडून राजापूर येथे आले. ते सामान्य डब्यातून प्रवास करत होते. राजापूर येथे उतरल्यानंतर काही वेळाने त्यांची पत्नी सोन्याचे दागिने असलेली बॅग रेल्वेतच विसरल्याचे लक्षात आले.
यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील चिंचाळा येथे बनावट बीटी कपाशीच्या बियाण्यांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यावर या माहितीच्या आधारे कृषी विभागाने सापळा रचत बियाणे जप्त केली आहेत.
वाढलेली उष्णता आणि भूगर्भातील पाण्याची पातळी खालावल्याने तालुक्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. याचा अधिक फटका जामसंडे आणि देवगड शहरांना बसत आहे.
प्रवीण इस्लामाबाद आणि कराची येथील पाकिस्तानी गुप्तचर संस्था आणि सैन्याधिकारी यांना माहिती देत होता. फेसबूक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सपद्वारे माहिती पाठवली जात होती.
डॉ. तावडे या एका उच्चशिक्षित व्यक्तीला कुठलेच पुरावे नसतांना अशा प्रकारे आयुष्यातील ८ वर्षे कारागृहात डांबून ठेवणे हा अन्याय निश्चितच चीड निर्माण करणारा आहे – ह.भ.प. अरुण महाराज पिंपळे
सध्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त असून अद्याप या प्रकरणी पोलीस तक्रार करण्यात आली नाही. मुख्य भगवान पार्श्वनाथ यांच्या मूर्ती पूजनाच्या वेळेवरून हा वाद झाल्याचे समजते.