जबलपूर येथील भंगार गोदाम स्फोट प्रकरणी नागपूर येथून दोघांना अटक !

मध्यप्रदेशातील जबलपूर येथील भंगार गोदामातील स्फोट प्रकरणी जबलपूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नागपूर पोलिसांच्या साहाय्याने २५ मे या दिवशी करीम पटेल सत्तार पटेल (वय ५० वर्षे) आणि मन्सूर अश्रफी अशरफ अश्रफी (वय ४८ वर्षे) यांना अटक केली.

‘एस्.टी.’च्या कोल्हापूर विभागाला मे महिन्यात साडेतेवीस कोटी रुपयांचे उत्पन्न !

सुटीच्या कालावधीत एस्.टी.ने पुणे, मुंबई, सोलापूर येथे विशेषकरून अधिकच्या फेर्‍या केल्या. खासगी प्रवासी वाहतुकीच्या तुलनेत ‘एस्.टी.’चे दर हे सामान्य प्रवाशांना परवडणारे असल्याने त्यांचा ओढा एस्.टी.कडे अधिक दिसून येतो.

प्रदूषण करणार्‍या घटकांवर कारवाई करा ! – डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, विभागीय आयुक्त, पुणे

नदीतील प्रदूषण उघडपणे होत असतांना गणेशोत्सवाच्या वेळी कांगावा करणारे पुरोगामी कुठे आहेत ?

कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी कचरा उचलला जात नाही !

‘समाजमन’ संस्थेच्या पहाणीत वास्तव उघड

सांगली येथे अनधिकृत नळजोडणीचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न शिवसेनेने हाणून पाडला !

सांगली येथील रहिवासी भावेश शहा आणि राजरतन या दोघांनी अनधिकृत नळजोडणी घेतली होती. याविषयी शिवसेनेने आंदोलन करून आवाज उठवून या दोघांवर कारवाई करण्याची मागणी केली होती

मुंबईत २० बांगलादेशी घुसखोरांना ८ महिन्यांचा कारावास !

मुंबईत रहाणार्‍या २० बांगलादेशी घुसखोरांना किल्ला सत्र न्यायालयाने ८ महिन्यांचा कारावास आणि प्रत्येकी ४ सहस्र रुपये इतका दंड अशी शिक्षा दिली आहे.

‘हमारे बारह’ हिंदी चित्रपट करमुक्त करा ! – महाराष्ट्र करणी सेना

प्रत्येक धर्मातील वाईट प्रथा, चालीरिती मताच्या राजकारणामुळे सरकार बंद करत नसेल; परंतु चित्रपटाद्वारे त्याविषयी जागृती केली जात असेल

अंदाजपत्रकामध्ये पुणे शहरातील ‘सिग्नल’ दुरुस्तीसाठी रकमेचे प्रावधानच नाही !

शहरातील ठिकठिकाणचे ‘सिग्नल’ (वाहतूक नियंत्रक दिवे) दुरुस्तीसाठी प्रतिवर्ष अंदाजपत्रकांमध्ये अडीच ते तीन कोटी रुपयांचे प्रावधान केले जाते.

जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात ८ दिवसांपासून मृतांचा खच !

गेल्या ८ दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात विविध कारणांनी मृत पावलेले ५० मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवागृहात आणण्यात आले होते.

कोपरगावात (अहिल्यानगर) आढळले ३ मृतदेह, उष्माघाताने ३ मृत्यू झाल्याची शक्यता !

कोपरगाव शहरात काही दिवसांपासून तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे आहे.