Israel Hezbollah Conflict : इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात पुन्हा संघर्ष !

इस्रायलने शस्त्रसंधी कराराचा भंग केल्याचा आरोप करून हिजबुल्लाने इस्रायलवर आक्रमण केले होते. त्याला इस्रायलने हवाई आक्रमणाने  प्रत्युत्तर दिले आहे.

Israel Banned Mosques Speakers : मशिदींवरील सर्व भोंग्यांवर बंदी घालून ते जप्त करा ! – इस्रायल

भारतात अनेक दशके अशा प्रकारचा त्रास होत असतांना आणि तक्रारी करून अन न्यायालयाने आदेश देऊनही बंदी घातली जात नाही ! आता भारतालाही इस्रायलप्रमाणे अशी कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

इस्रायलने आमच्या सैनिकांना सोडल्यास आम्हीही इस्रायली ओलिसांना सोडू ! – हमास

हिजबुल्लाप्रमाणे हमासही आता युद्धविरामासाठी सिद्ध झाला आहे. हमासच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, आम्ही इजिप्त, कतार आणि तुर्कीये या देशांच्या मध्यस्थांना कळवले आहे की, आम्ही इस्रायलशी युद्धविराम, तसेच बंदीवानांचे परस्पर प्रत्यार्पण, हे करार करण्यास सिद्ध आहोत.

Israel- Hezbollah Cease Fire : इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात युद्धविराम

इस्रायल आणि लेबनॉन यांच्यामधील युद्धविराम कराराला इस्रायलच्या युद्ध मंत्रीमंडळाने संमती दिली. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी यापूर्वीच युद्धविरामाला संमती दिली आहे.

हिजबुल्लाने इस्रायलवर डागली २५० क्षेपणास्त्रे

हिजबुल्लाचे हे आक्रमण लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये गेल्या आठवडाभरापासून चालू असलेल्या इस्रायली आक्रमणांना प्रत्युत्तर आहे. या आक्रमणांमध्ये हिजबुल्लाचा प्रवक्ता महंमद अफिफसह ६३ हून अधिक लोक मारले गेले आहेत.

ICC Arrest Warrant Against Israel PM : नेतान्याहू आमच्या देशात आले, तर अटक करू ! – ब्रिटन, इटली, नेदरलँड  आणि कॅनडा

गाझामधील आक्रमणांवरून आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचा इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या विरोधात अटक वॉरंट

Netanyahu House Attack : इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या घरावर बाँबद्वारे आक्रमण : जीवित हानी नाही

घटनेच्या वेळी पंतप्रधान आणि त्यांचे कुटुंबीय घरी नव्हते. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.

Hezbollah Attacks Israel : हिजबुल्लाने इस्रायलवर डागले १६५ रॉकेट : ७ जण घायाळ

इस्रायलमधील बीना, हैफा आणि गॅलीली या शहरांना लक्ष्य करण्यात आले. इस्रायलच्या सैन्याच्या दाव्यानुसार हे रॉकेट हवेतच नष्ट करण्यात आले.

Israel Accepts Responsibility Of Pager Attack : इस्रायलने स्वीकारले हिजबुल्लावरील पेजर आक्रमणाचे दायित्व !

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे प्रवक्ते ओमर दोस्ती यांनी ‘एएफ्पी’ वृत्तसंस्थेला सांगितले की, १० नोव्हेंबरला झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नेतन्याहू यांनी लेबनॉनमध्ये पेजरवरील आक्रमणाच्या आदेशाला दुजोरा दिला.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा पथकांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी !

इस्रायलने संयुक्त राष्ट्रांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. प्रथम संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांना इस्रायलमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली होती. आता इस्रायली संसदेने दोन कायदे संमत करून संयुक्त राष्ट्रांना इस्रायलच्या भूमीवर काम करण्यास बंदी घातली आहे.