गोदान एक्सप्रेसच्या डब्याखालून अचानक धूर निघाल्याने प्रवाशांचा गोंधळ !

इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावाजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्याखालून अचानक धूर निघाला. त्यामुळे बोगीत गोंधळ उडाला. पडताळणी केली असता तांत्रिक अडचण असल्याचे लक्षात आले.

पुणे-सोलापूर रस्त्यावर होर्डिंग कोसळले !

पुणे-सोलापूर रस्त्यावरील कवडीपाट पथकर नाक्याजवळील गुलमोहर लॉन्स या कार्यालयासमोरील होर्डिंग कार्यालयाच्या समोर कोसळले. यामुळे दुचाकी, चारचाकी यांसह बँड वादकाच्या गाडीचीही हानी झाली आहे.

पनवेल येथे ‘श्रीकृष्ण चिकित्सालया’चा तृतीय वर्धापनदिन साजरा !

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चालू करण्यात आलेल्या डॉ. अशोक तांबेकर यांच्या ‘श्रीकृष्ण चिकित्सालया’चा तृतीय वर्धापनदिन साजरा करण्यात आला.

पुणे येथील बांधकाम व्यावसायिक राम नदीत सांडपाणी सोडत असल्याचा ‘आप’चा आरोप !

राम नदीच्या प्रदूषणाच्या संदर्भात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात (एन्.जी.टी.) सुनावणी चालू आहे. यामध्ये पुणे जिल्हा परिषद, पुणे महापालिका, पुणे महानगर विकास प्राधिकरण (पी.एम्.आर्.डी.ए.) यांच्या विरोधात हा दावा प्रविष्ट आहे.

पुणे येथील ठाकरे गट युवासेनेमधील अनेक पदाधिकार्‍यांनी आदित्य ठाकरेंकडे दिले त्यागपत्र !

लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी एकीकडे उद्धव ठाकरेंनी सभांचा धडाका लावला आहे, तर दुसरीकडे पुणे येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील अंतर्गत नाराजी समोर आली आहे.

होर्डिंग उभारण्यासाठी महापालिकेच्या समोरील झाडाच्या फांद्या तोडल्या !

एकमेकांशी समन्वय नसणार्‍या विभागांमुळेच प्रशासनाची कार्यक्षमता घटते, नागरिकांना त्रास होतो, हे लक्षात घ्यावे !

‘आर्.टी.ई.’ अंतर्गत प्रवेशासाठी पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करावेत ! – योगेश कडूसकर, उपायुक्त

वर्ष २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी आर्.टी.ई. (बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार) अंतर्गत यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केलेल्या बालकाच्या पालकांनी पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

बनावट हलाल प्रमाणपत्र देणार्‍या ‘हलाल काऊन्सिल ऑफ इंडिया’च्या ४ आरोपींना अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून जामीन संमत !

अलाहाबाद उच्च न्यायालयाने ‘हलाल काऊन्सिल ऑफ इंडिया’ या संघटनेच्या ४ पदाधिकार्‍यांना जामीन संमत केला आहे. या सर्वांवर बनावट हलाल प्रमाणपत्र देऊन धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे.

कोंढवा (पुणे) येथे केलेल्या कारवाईत २३ म्हशी आणि रेडकू यांची सुटका !

गायी-म्हशींची अवैध वाहतूक करणार्‍या धर्मांधांवर जरब बसेल असा धाक पोलीस निर्माण करणार का ?

संशयित गणेश मिस्कीन आणि अमित बद्दी यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याने त्यांना जामीन संमत करावा ! – अधिवक्ता समीर पटवर्धन

कॉ. पानसरे हत्या प्रकरणातील संशयित गणेश मिस्कीन आणि अमित बद्दी यांना जामीन मिळण्यासाठी आवेदन सादर करण्यात आले असून त्या संदर्भात अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी युक्तीवाद केला.