पुणे येथील ‘रिंग रोड’साठी पात्र ठरलेली ५ पैकी २ आस्थापने वादग्रस्त !

एम्.एस्.आर्.डी.सी.कडून ‘रिंग रोड’चा प्रकल्प हाती घेतला होता. त्याची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यात ५ आस्थापने पात्र ठरली होती. त्यातील काही आस्थापने ‘निवडणूक रोखे घोटाळा’ प्रकरणातील आहेत.

कराड येथील ६८ ॲकॅडमी विनाअनुमती !

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या प्रकरणाची गंभीर नोंद घेतली आहे. तसेच या अनधिकृत ॲकॅडमींवर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

राज्यशासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अननुभवी कंत्राटदाराची नियुक्ती !

असे करणार्‍या संबंधित अधिकार्‍यांनाही कंत्राटदारासह कारागृहात डांबायला हवे !

‘दत्तभूमी’ तीर्थक्षेत्र विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू ! – भाजप आमदार मोनिका राजळे

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली शेवगावची ‘दत्तभूमी’ तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपास येण्यासाठी, तसेच साधक आणि दत्तभक्त यांना अधिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जातील..

आषाढीवारी पालखी सोहळ्यात वारकर्‍यांना उत्तम सोयीसुविधा देण्यावर भर देण्यात येतील !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या ‘आषाढी वारी पालखी सोहळा २०२४’च्या नियोजनासाठी महापालिकेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अपेक्षित जगतो का ? याचा विचार करूया !  – राजेंद्र आर्लेकर, राज्यपाल, बिहार

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तीमत्त्व आपणाला प्रेरक वाटते. त्यावरील विविध कार्यक्रमांनाही आपण उपस्थित रहातो; परंतु त्यांना अपेक्षित असे जीवन आपण जगतो का ? याचा विचार करूया, असे आवाहन बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी उपस्थितांना केले.

विमानात धूम्रपान करणारा प्रवासी अटकेत !

जयपूर-मुंबई विमान प्रवासात धूम्रपान करतांना प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. अर्जुन राम ठालोर (वय ३४ वर्षे) असे त्याचे नाव असून तो राजस्थान येथील रहिवासी आहे. त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

प्रखर हिंदुत्वनिष्ठ भाजप आमदार टी. राजासिंह यांची हिंदुत्वनिष्ठांकडून सदिच्छा भेट !

कोल्हापूर येथे लवकरच हिंदू एकता आंदोलन आणि सकल हिंदू समाज यांच्या वतीने आमदार टी. राजासिंह यांची जून महिन्यात सभा घेण्याचे नियोजन आहे.

प्रखर हिंदुत्वनिष्ठ भाजप आमदार टी. राजासिंह ठाकूर यांची भारत हिंदु राष्ट्र होण्यासाठी श्री महालक्ष्मीदेवीच्या चरणी प्रार्थना !

या प्रसंगी सकल हिंदू समाजाच्या वतीने त्यांना कोल्हापूर येथे जाहीर सभा घेण्यासाठी विनंती करण्यात आली.

मूल्यांची जोड नसेल, तर शिक्षण केवळ अहंकार वाढवते ! – रमेश बैस, राज्यपाल

शिक्षणाला मूल्य, नीतीमत्ता आणि मानवता यांची जोड देणे आवश्यक आहे. तसे नसेल, तर शिक्षण केवळ व्यक्तीचा अहंकार वाढवते, असे वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी केले.