बीडमध्ये ‘कमळाला मतदान का केले ?’ याचा जाब विचारत कुटुंबावर तलवारीने आक्रमण !

पोलिसांचा धाक संपल्यानेच अशा प्रकारे गुंडगिरी, दादागिरी चालू आहे, असे म्हटल्यास नवल ते काय !

छत्रपती संभाजीनगर येथे विद्यार्थ्यांच्या कॉपी प्रकरणाची सुनावणी चालू !

येथील इयत्ता १० वीच्या १४६, तर इयत्ता १२ वीच्या १९१ जणांची परीक्षेतील अपप्रकार प्रकरणी सुनावणीची दुसर्‍या टप्प्यातील प्रक्रिया होणार आहे. या सुनावणीस संधी देऊनही उपस्थित न राहिल्यास एकांगी निर्णय देण्यात येणार..

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : पत्रकार केतन तिरोडकर यांना अटक !; विधान परिषदेची शिक्षक आणि पदवीधर निवडणूक पुढे ढकलली…

येथे दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना थेट मंदिरात जाता यावे, यासाठी बहुमजली वाहनतळापासून मंदिराच्या पूर्व दरवाजापर्यंत ‘स्कायवॉक’साठी चाचपणी करण्यात आली.

प्रचंड गर्दीमुळे गंगोत्री आणि यमुनोत्री येथील व्यवस्थापन ढेपाळले !

चारधाम यात्रेला प्रारंभ होऊन काही दिवस झाले आहेत. चारधाम पैकी बद्रीनाथ आणि केदारनाथ येथील स्थिती नियंत्रणात असली, तरी गंगोत्री अन् यमुनोत्री येथे भाविकांच्या संख्येत प्रतिदिन वाढ होत आहे.

मोठ्या फलकांचे संरचनात्मक लेखा परीक्षण न केल्यास गुन्हे नोंदवणार ! – सातारा नगरपालिका

ही कृती अगोदर का केली नाही ? मोठ्या दुर्घटना झाल्यावर जागे होणारे प्रशासन नको, तर दुर्घटनाच होऊ नये, यासाठी प्रयत्न करणारे प्रशासन हवे !

‘न्यूज क्लिक’चे संपादक पुरकायस्थ यांची सुटका करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

‘न्यूज क्लिक’ने चीनकडून बेकायदा निधी घेतल्याचा आरोप आहे, तसेच चीनच्या प्रचारासाठी न्यूज क्लिकला कोट्यवधी रुपयांचा विदेशी निधी मिळाल्याचा आरोप करण्यात आला होता. हा निधी अमेरिकेच्या मार्गाने पुरवण्यात आल्याचे सांगण्यात येत होते.

मुंबईत पाकिस्तानमधून स्फोटके येणार असल्याचा पोलिसांना निनावी दूरभाष !

पाकिस्तानमधून मुंबईत ‘आर्.डी.एक्स.’ येणार असल्याचा निनावी दूरभाष वाडीबंदर येथील पोलिसांच्या नियंत्रण कक्षात आला. अस्लम अली हा कराची येथून मुंबईत ३५० किलो ‘आर्.डी.एक्स.’ घेऊन येणार आहे.

कामात प्रगती नसल्याने अभियंत्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस !

ठेकेदाराकडून जे काम करण्यात येत आहे, ते पूर्ण क्षमतेने चालू नसल्याचे निदर्शनास आले. त्याचसमवेत कामावर ठेकेदाराचे कुणीही कामगार उपस्थित नव्हते आणि कोणतीही यंत्रसामुग्री उपलब्ध नव्हती

मी तुमच्याकडे विकसित भारतासाठी आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

‘सप्तश्रृंगीमाता आणि नाशिक येथील प्रभु रामचंद्र यांना मी नमन करतो. तुमची सेवा हेच माझे सर्वांत मोठे लक्ष्य आहे. गेल्या १० वर्षांत तुम्ही माझे काम पाहिले आहे.

शिवरायांच्या अवमानाचा विचारही मनात येऊ शकत नाही ! – प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस

वाराणसी लोकसभा मतदारसंघामध्ये १४ मे या दिवशी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधानांना छत्रपती शिवाजी महाराज घालत होते, त्याप्रमाणे जिरेटोप घालून त्यांचा सन्मान केला.