गेल्या निवडणुकीत मतदान केले; मात्र या निवडणुकीत मतदारसूचीत नाव नाही !

निवडणूक आयोगाकडून एकीकडे मतदानाचे प्रमाण वाढण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. यासाठी कोट्यवधी रुपये खर्चही केला जात आहेत. असे असले, तरी गेल्या वेळच्या निवडणुकीत  मतदान केलेल्या अनेकांची नावे या निवडणुकीच्या वेळी  मतदारसूचीत नसल्याचे निदर्शनास आले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार थांबला

सिंधुदुर्ग मतदारसंघात मुख्य लढत ही महाविकास आघाडीतील ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने’चे उमेदवार तथा विद्यमान खासदार विनायक राऊत आणि महायुतीतील भाजपचे उमेदवार तथा केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यात होणार आहे.

उकाड्यामुळे मतदान केंद्रांवर मतदारांना मिळणार लिंबूपाणी आणि शीतपेय ! – मुख्य निवडणूक अधिकारी

उकाड्यामुळे राज्यातील सर्व १ सहस्र ७२५ मतदान केंद्रांमध्ये सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत लिंबूपाणी आणि शीतपेय पुरवले जाणार आहे, तसेच सर्वत्र ‘कूलर’, पिण्यासाठी पाणी, मतदान केंद्राच्या बाहेर सावलीसाठी मंडप आणि मतदारांसाठी वैद्यकीय सुविधा पुरवल्या जाणार आहेत.

विभागीय भरारी पथकाद्वारे जिल्ह्यात ८६ सहस्र ३५९ रुपयांचा अवैध साठा जप्त !

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथकाद्वारे जिल्ह्यात गेल्या ४ दिवसांत हवेली तालुक्यात डुडुळगाव, वाघोली, शिंदवणे, उंड्री या परिसरांत धाडी टाकण्यात आल्या.

गोव्यात लोकसभा निवडणूक प्रचार थंडावला !

लोकसभा निवडणूक २०२४ साठीचा गोव्यात गेले एक महिना चालू असलेला प्रचार ५ मे या दिवशी सायंकाळी ५ वाजता थंडावला. लोकसभेच्या उत्तर आणि दक्षिण गोवा या दोन्ही मतदारसंघांसाठी ७ मे या दिवशी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

मतदारांना भेटण्यासाठी निवडणूक आयोगाकडून सर्वसाधारण निरीक्षक भुवनेश प्रताप सिंग यांची नियुक्ती

 ४६- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात भारत निवडणूक आयोग, नवी देहली यांच्याकडून नागरिक आणि मतदार यांना भेटण्यासाठी सर्वसाधारण निरीक्षक भुवनेश प्रताप सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम्. देवेंदर सिंह यांनी दिली आहे.

पनवेल ते मडगाव आणि सावंतवाडी विशेष रेल्वेगाड्या धावणार !

 उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत.

पुणे येथे पथारी व्यावसायिकांकडे ५६ कोटी रुपयांची थकबाकी !

शहरातील ९ सहस्र ८५२ पथारी (फेरीवाले) व्यावसायिकांची अंदाजे ५६ कोटी १७ लाख रुपयांची थकबाकी असल्याचे समोर आले आहे. ही थकबाकी भरावी अन्यथा परवाना रहित केला जाईल, अशी चेतावणी पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने दिली आहे.

मतदानाच्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यातील आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश

मतदारांना मतदानाचा अधिकार बजावता यावा, मतदान सुरळीतपणे पार पाडावे, यासाठी मतदानाच्या दिवशी मंगळावर, ७ मे या दिवशी जिल्ह्यातील आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी, तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम्. देवेंदर सिंह यांनी दिले आहेत.