राज्यघटनेच्या प्रस्तावनेत समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द घुसडून संविधानाच्या मूळ चौकटीला धक्का लावला आहे ! – माधव भांडारी, प्रवक्ते, भाजप
भारतीय राज्यघटनेत सर्वाधिक दुरुस्त्या नेहरु-गांधी परिवारांच्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या राजवटीत झाल्या असून राज्यघटनेच्या प्रस्तावनेत समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द घुसडून संविधानाच्या मूळ चौकटीला धक्का लावला आहे, असा आरोप भाजपचे नेते माधव भांडारी यांनी केला.