४२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत !
![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2020/12/20111056/ganja_vikri_kudal320.jpg)
नाशिक – समृद्धी महामार्गावर महाराष्ट्र सुरक्षा फोर्सच्या गस्ती पथकाने दोन वाहनांमधून तस्करी होणारा ४२.९६ लाख रुपयांचा २१४.८०० किलो गांजा पकडला. या वेळी वाहनांतून आलेल्यांनी महामार्गावर असणारी सुरक्षा भिंत ओलांडून पलायन केले. वाहनांच्या पडताळणीत संबंधित गोण्यांमध्ये गांजा असल्याचे आढळून आले.
संपादकीय भूमिका :गांजाची तस्करी करणार्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी ! |