दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : मुलुंड येथे ४७ लाख रुपयांची रक्कम जप्त ! ; मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ! …

मुलुंड परिसरात एका चारचाकीतून पोलिसांनी ४७ लाख रुपयांची रक्कम जप्त केली आहे. पोलिसांनी ही रक्कम, गाडी आणि गाडीचालक यांना कह्यात घेतले असून या प्रकरणी पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.

सनातन संस्थेला गोवण्याचे शहरी नक्षलवाद्यांचे प्रयत्न विफल !

पुरोगामी, साम्यवादी व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी आणि भगवा आतंकवाद सिद्ध करण्यासाठी तपासयंत्रणांचे षड्यंत्र न्यायालयाच्या निर्णयामुळे उद्ध्वस्त झाले, हे डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाच्या निकालातून लक्षात येते !

चार धाम यात्रेला प्रारंभ : केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले !

उत्तराखंड राज्यातील चार धाम यात्रेला १० मे पासून प्रारंभ झाला. सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले.

केजरीवाल यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन संमत

मद्य धोरण घोटाळ्याच्या प्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाने देहलीचे आम आदमी पक्षाच्या सरकारचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन संमत केला आहे.

पीलीभीत (उत्तरप्रदेश) येथे अपघातात ३ कामगारांचा मृत्यू !

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घायाळांना ट्रकमधून बाहेर काढले. घायाळ कामगारांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात भरती करण्यात आले.

उत्तरप्रदेशात निवडणुकीत नोटांऐवजी अमली पदार्थांचा विक्रमी पुरवठा !

१६ मार्च या दिवशी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली होती. निवडणूक आयोगाच्या ‘मनी पॉवर वॉच टीम’ने १३ एप्रिलपर्यंत ४ सहस्र ६५० कोटी रुपयांची रोकड, दारू, अमली पदार्थ इत्यादी जप्त केले.

पुणे येथील येरवडा कारागृहात बंदीवानांकडून हवालदाराला त्याच्याच काठीने बेदम मारहाण !

येरवडा कारागृहात बंदीवानांनी नानासाहेब मारणे या हवालदारास त्यांच्याच काठीने केलेल्या मारहाणीत त्यांच्या मनगटाचे हाड मोडले आहे. या प्रकरणी नानासाहेब मारणे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.

Dabholkar Murder Case Verdict : निकाल विलंबाने लागल्याचे सांगत अंनिसचा थयथयाट !

अकरा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा निकाल जाहीर झाला आहे.

No Import Of Ammunition:भारतीय सैन्यदल यापुढे शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा आयात करणार नाही !

सैन्यदल सध्या वार्षिक ६ ते ८ सहस्र कोटी रुपयांचा दारुगोळा खरेदी करत आहे. आता त्यांचा पुरवठा भारतीय स्रोतांकडून होईल.

Dabholkar Murder Case Verdict : खोट्या आरोपांखाली सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना फसवण्यात आले ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय

न्यायालयाने शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना दोषी ठरवले आहे. या विरोधातही मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) करणे आवश्यक आहे.