अहिल्यानगर येथे प्रवरा नदीपात्रात बचाव पथकाची बोट उलटून ३ जणांचा मृत्यू !

अकोले तालुक्यात प्रवरा नदीपात्रात बचाव कार्य करणारी एस्.डी.आर्.एफ्. पथकाची बोट २३ मे या दिवशी उलटली. त्यामुळे बचाव कार्य करणारे सैनिक पाण्यात पडून ३ जण बुडले, तर अन्य बेपत्ता आहेत.

पोर्तुगालचे नागरिकत्व स्वीकारलेल्या गोमंतकियांनी लोकसभा निवडणुकीत मतदान केल्याची शक्यता

गोव्यात ७ मे या दिवशी झालेल्या उत्तर आणि दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान झाले. या वेळी पोर्तुगालचे नागरिकत्व स्वीकारलेल्या काही गोमंतकियांनी मतदान केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

धार्मिक भावना दुखावणार्‍या कुंकळ्ळी (गोवा) येथील श्रेया धारगळकर हिच्या विधानाचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून निषेध

धार्मिक भावना दुखावण्याचे धाडस कुणीही करू नये, यासाठी या प्रकरणी कडक कारवाई केली जाणार !

छत्रपती संभाजीनगर येथे पत्नीला भ्रमणभाषवर तलाक देणार्‍या पतीसह ७ जणांवर गुन्हा नोंद !

घर घेण्यासाठी माहेरहून ५० लाख रुपये आण, या मागणीसाठी विवाहितेचा छळ चालू होता. सासर्‍यांना दूरभाष करून पतीने पत्नी रुखसाना सुफियान कुरेशी (२१ वर्षे) यांना तलाक दिल्याची घटना नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे घडली.

सांगली आणि मिरज येथील शासकीय रुग्णालयांतील प्रश्न सोडवण्यासाठी विकास समिती स्थापन करणार !

‘सिव्हिल रुग्णालयातील औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र भागवत, पूर्वीचे सहयोगी प्राध्यापक डॉ. बिंदूसार पलंगे, श्री. उदय जगदाळे, डॉ. प्रसाद चिटणीस यांनी रुग्णालयाची सद्यःस्थिती आणि अडचणी यांविषयी सांगितले.

काँग्रेस पक्षाचे आमदार पी.एन्. पाटील यांचे निधन !

काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि करवीर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे आमदार पी.एन्. पाटील (वय ७१ वर्षे) यांचे २३ मे या दिवशी खासगी रुग्णालयात निधन झाले.

पालखीच्या पुणे मुक्कामात पोलिसांकडून अडवणूक झाल्यास पालखी दर्शनासाठी रस्त्यावरच ठेवू !

अन्य धर्मियांच्या नव्हे, तर केवळ हिंदूंच्याच धार्मिक गोष्टींत आडकाठी आणणारे पोलीस दुटप्पीच !

ठाणे जिल्ह्यातील डोह आणि ओहोळ आटले !

ठाणे जिल्ह्यातील रणरणते ऊन, तीव्र बाष्पीभवन यांमुळे गावोगावचे पाण्याने भरलेले डोह आणि ओहोळ आटले आहेत. त्यामुळे प्राण्यांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे.

अमरावती येथे शाळेच्या प्रवेश अर्जांची ५०० ते सहस्र रुपयांपर्यंत विक्री !

शाळा प्रवेशाचा लुटारू बाजार ! शिक्षण विभाग आणि सरकार याकडे लक्ष देणार का ?

महाराष्ट्रात येणारा वायूप्रकल्प राज्याबाहेर कसा गेला ? याचे उत्तर उद्योगमंत्र्यांनी द्यावे ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

गॅस ॲथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (गेल) आस्थापन मध्यप्रदेशमध्ये नवीन प्रकल्प उभारणार आहे. महाराष्ट्रात येणारा ५० सहस्र कोटी रुपयांचा हा प्रकल्प राज्याच्या बाहेर कसा गेला ? याचे उत्तर उद्योगमंत्र्यांनी द्यावे, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे.