केजरीवाल यांना मिळालेल्या जामिनामुळे पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी यांना आनंद !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – मोदीजी आणखी एक लढाई हरले. केजरीवाल यांची सुटका झाली असून ही संयत भारतासाठी चांगली बातमी आहे, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचे माजी माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मिळालेल्या अंतरिम जामिनावर व्यक्त केली. फवाद चौधरी यांनी काही दिवसांपूर्वी ‘एक्स’वर एक व्हिडिओ शेअर करून राहुल गांधी यांचे कौतुक केले होते. त्यावर टीका करतांना पंतप्रधान मोदी यांनी एका प्रचारसभेत म्हटले होते की, भारतात काँग्रेस कमकुवत होत असतांना पाकिस्तानी नेते काँग्रेससाठी प्रार्थना करीत आहेत. काँग्रेस कमकुवत झाल्यामुळे पाकिस्तानी रडत आहेत. पाकिस्तान आणि काँग्रेस यांच्यातील मैत्री चव्हाट्यावर आली आहे.
'Kejriwal's release is good news for India!' says Ex-minister of Pakistan, Fawad Chaudhary on #Kejriwal's bail!
👉Rather than talking about what's good for #India and what's not, Fawad Chaudhary should talk about the condition of #Pakistan which is getting worse day by day! pic.twitter.com/M0v2qegivz
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 11, 2024
संपादकीय भूमिकाभारतासाठी काय चांगले आहे आणि काय नाही ? यावर बोलण्यापेक्षा पाकिस्तानची स्थिती दिवसेंदिवस वाईट होत आहे, यावर फवाद चौधरी यांनी बोलावे ! |