पुणे – सामाजिक माध्यमावर झालेल्या ओळखीतून तरुणीला आधुनिक वैद्याने ‘क्लिनिक’मध्ये बोलवून तिला मद्य पाजून बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी २० वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून विश्रामबाग पोलीस ठाण्यात शुभंकर महापुरे या आधुनिक वैद्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा प्रकार २४ सप्टेंबरला रात्री पावणे दहा वाजता नारायणपेठेतील डॉ. महापुरे यांच्या क्लिनिकमध्ये घडला.
महापुरे यांनी पीडितेला स्वत:च्या क्लिनिकमध्ये जेवणासाठी बोलावले. तरुणी क्लिनिकमध्ये आली असता, तिला मद्य देण्यात आले. यामुळे तिला गुंगी आली. त्याचा अपलाभ घेत शुभंकर महापुरेने बलात्कार केला.
संपादकीय भूमिकानैतिकतेचे किती मोठ्या प्रमाणात हनन झाले आहे, हे दर्शवणारी घटना ! आधुनिक वैद्याकडून असा किळसवाणा प्रकार होणे, हे निंदनीय आणि लज्जास्पद आहे. अशा आधुनिक वैद्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, तरच भविष्यात असे प्रकार थांबू शकतील ! |