मुंबईतील रेल्‍वेस्‍थानकांवर अत्‍याधुनिक सीसीटीव्‍ही कॅमेरे लावणार !

रेल्‍वे प्रवाशांच्‍या सुरक्षिततेसह, रेल्‍वे स्‍थानकांतील गुन्‍हेगारी कारवायांवर नियंत्रण ठेवण्‍यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने अद्ययावत सीसीटीव्‍ही कार्यान्‍वित करण्‍याचा निर्णय रेल्‍वे मंत्रालयाने घेतला आहे. ‘रेलटेल’च्‍या साहाय्‍यानेने प्रवासी सुरक्षिततेचे आधुनिकीकरण करण्‍यात येणार आहे. 

पुण्यात सराईत गुन्हेगार आणि निवृत्त पोलीस कर्मचार्‍यामधील झटापटीत गुन्हेगाराचा मृत्यू !

अनंत ओव्हाळ हे बोपोडीतील आनंदनगर परिसरात काही कामानिमित्त गेले होते. या वेळी गुन्हेगार मनिष भोसलेने त्यांची दुचाकी अडवत त्यांच्यासोबत वाद घातला. यानंतर दोघांनीही एकमेकांना मारहाण केली. या झटापटीत मनिषचा मृत्यू झाला.

सचिन वाझे यांच्या कोठडीसाठी न्यायालयात अर्ज करणार !

वाझे यांच्या विरोधात काही महत्त्वाचे साक्षीदार न्यायालयात जबाब देण्यास सिद्ध आहेत. त्यामुळे सचिन वाझे यांना कह्यात घेण्यासाठी आम्ही २५ मार्च या दिवशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयात अपील करणार आहोत, अशी माहिती आतंकवादविरोधी पथकाचे प्रमुख जयजीत सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे येथील डुल्या मारुति मंदिरात चोरीची घटना घडूनही अद्याप तक्रार नोंद नाही

येथील गणेश पेठेतील डुल्या मारुति मंदिरात दर्शन घेण्याचे निमित्त करून ‘मास्क’ घालून आलेल्या अज्ञात चोराने दानपेटीतील रोकड चोरून नेली.

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून हॉटेल ट्रायडेंटमधील ‘सी.सी.टी.व्ही.’ची तपासणी

या प्रकरणी अटक करण्यात आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे हे १६ ते २० फेब्रुवारी या कालावधीत हॉटेल ट्रायडेंटमध्ये राहिले होते. तेथे त्यांनी बनावट आधारकार्ड दाखवले असल्याचा दावा राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून करण्यात आला आहे.