पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती समारोहात खासदार डॉ. सुधांशु त्रिवेदी यांना ‘हलाल जिहाद’ ग्रंथ भेट !

डॉ. सुधांशु त्रिवेदी

यवतमाळ – येथील अभ्यंकर कन्या शाळेच्या प्रांगणात पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा १०८ वा जयंती समारोह पार पडला. या वेळी भाजपचे खासदार डॉ. सुधांशु त्रिवेदी यांना आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये हिंदु जनजागृती समितीचे यवतमाळ समन्वयक श्री. मंगेश खान्देल यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांविषयी चर्चा केली. या वेळी त्यांना हिंदु जनजागृती समितीचा ‘हलाल जिहाद ?’ हा हिंदी भाषेतील ग्रंथ, तसेच हलाल (इस्लामनुसार जे वैध आहे ते) प्रमाणपत्र रहित करण्याच्या प्रक्रियेसंबंधीचे निवेदन देण्यात आले.

‘हलाल जिहाद’ हिंदी भाषिक ग्रंथ (चित्रावर क्लिक करा)

या वेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करतांना डॉ. सुधांशु त्रिवेदी म्हणाले, ‘‘चुकीची धोरणे राबवल्याने पाकिस्तानची अधोगती, तर योग्य धोरणांमुळे भारताची प्रगती होत आहे. पारधी आणि शेतकरी यांच्या विकासाचे सेवाकार्य दीनदयाल संस्था राबवत आहे.’’

 (सौजन्य : Deendayal Seva Pratishthan)

या कार्यक्रमामध्ये डॉ. सुधांशु त्रिवेदी यांच्या हस्ते आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या महिलांच्या यशोगाथा सांगणार्‍या ‘मोडला नाही कणा’ या पुस्तिकेचे प्रकाशन या वेळी करण्यात आले.