‘श्री गणपति पंचायतन देवस्थान ट्रस्ट’ येथे महिलांसाठी श्री गणपति अथर्वशीर्ष पठण !

अथर्वशीर्ष हे अत्यंत सोपे असून आपल्याला समजेल असे आहे. ईश्वरापर्यंत जाण्याचे अत्यंत सोपे साधन म्हणजे अथर्वशीर्ष होय !

सतर्कता आणि स्‍वसंरक्षण प्रशिक्षण हाच महिलांवरील अत्‍याचार थांबवण्‍याचा उपाय ! – सौ. धनश्री केळशीकर, प्रवक्‍त्‍या, सनातन संस्‍था

आज आपल्‍या देशात प्रत्‍येक चौदाव्‍या मिनिटाला बलात्‍कार होतो. साक्षीला भर रस्‍त्‍यात चाकूचे अनेक वार करून मारले जाते. त्‍या वेळी आजूबाजूची माणसे केवळ बघ्‍याची भूमिका घेतात. या घटनेवरून समाजाची दायित्‍वशून्‍यता दिसून येते.

धर्मनिरपेक्ष भारतात धार्मिक आधारावर असणारी हलाल अर्थव्यवस्था रहित करा ! – कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी निवेदन

धर्मनिरपेक्ष भारतात धार्मिक आधारावर असणारी हलाल अर्थव्यवस्था रहित करा, तसेच ‘सनातन धर्मा’ला नष्ट करण्याची आक्षेपार्ह आणि द्वेषमूलक भाषा करणारेयांना तात्काळ अटक करण्यात यावी.

३० सप्‍टेंबरला दादर येथे ‘मंदिर-संस्‍कृती रक्षण’ सभेचे आयोजन !

‘प्राचीन भारतीय मंदिर संस्‍कृती’चे रक्षण व्‍हावे, राष्‍ट्र, हिंदु धर्म आणि संस्‍कृती यांवर होणार्‍या आघातांना संघटितपणे विरोध करण्‍यासाठी दिशादर्शन व्‍हावे, यासाठी गौड सारस्‍वत ब्राह्मण टेंपल ट्रस्‍ट, महाराष्‍ट्र मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने ३० सप्‍टेंबरला दादर येथे ‘मंदिर-संस्‍कृती रक्षण’ सभेचे आयोजन केले आहे.

सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक उज्ज्वल वैद्य यांचे स्थानांतर !

उज्ज्वल वैद्य यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लाच घेणार्‍यांवर कडक कारवाई करत कार्यालयात येणार्‍या प्रत्येक तक्रारीची नोंद घेत त्यांनी ६ मासांत ७ मोठ्या कारवाया केल्या.

पुणे शहरात भ्रमणभाष आस्‍थापनांना नोटिसा !

 मुद्रांक शुल्‍क आणि नोंदणी विभागाने एका आस्‍थापनाला ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली आहे . ग्राहकांकडून भरमसाठ पैसे उकळणार्‍या भ्रष्‍ट भ्रमणभाष आस्‍थापनांंवर कडक कारवाई आवश्‍यक !

औषध खरेदीच्‍या निविदा प्रक्रियेतील विलंबामुळे डिसेंबरच्‍या शेवटपर्यंत क्षयरोगावरील औषधे मिळणे अवघड !

रुग्‍णांच्‍या संदर्भात इतका अक्षम्‍य हलगर्जीपणा का ? औषधे समयमर्यादेत मिळण्‍यासाठी निविदा प्रक्रियेस कधी प्रारंभ करावा, ते सरकारने ठरवले नाही का ?

भार्गवश्री बी.पी. सचिनवाला (वसई) यांच्‍या श्री परशुराम तपोवन आश्रमाला सनातनच्‍या सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांची सदिच्‍छा भेट !

भार्गवश्री बी.पी. सचिनवाला यांच्‍या पालघर जिल्‍ह्यातील वसई तालुक्‍यातील मेेढे या गावातील श्री परशुराम तपोवन आश्रमात सनातन संस्‍थेच्‍या धर्मप्रचारक सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांनी २६ सप्‍टेंबर या दिवशी सदिच्‍छा भेट दिली.

पुण्‍यातील ‘ग्राहक पेठ’ने गणेशोत्‍सवात साकारला ‘मार्सेलिसची उडी’ हा देखावा !

येथील सुप्रसिद्ध ‘ग्राहक पेठ’ यांच्‍या वतीने प्रतिवर्षी गणेशोत्‍सवानिमित्त देखावा आयोजित करण्‍यात येतो. मागील वर्षी त्‍यांच्‍याकडून बिस्‍किटांपासून बनवलेल्‍या हत्तीवर मूर्ती ठेवण्‍यात आली होती.

हडपसर (पुणे) येथे श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत मारहाण !

हडपसर येथील मांजरी भागात श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत ‘स्‍पीकर’चा (ध्‍वनीवर्धकाचा) आवाज मोठा असल्‍याने बाळासाहेब घुले आणि त्‍यांचे कुटुंबीय यांनी आवाज न्‍यून करण्‍यास सांगितले.