|
पणजी, २८ सप्टेंबर (वार्ता.) : प्रोफेट बजिंदर सिंग संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून ‘लंगर’ सेवेच्या नावाखाली बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर हिंदूंचे धर्मांतर केले जात होते. याविषयीचे चलचित्र २८ सप्टेंबर या दिवशी सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित झाले. याविषयी ‘शिव संघटने’चे अंकित साळगावकर यांनी भ्रमणभाषद्वारे तक्रार केल्यावर आगशी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विक्रम नाईक यांनी कारवाई करून धर्मांतर करण्याचा हा प्रयत्न हाणून पाडला. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर पोलीस नेमण्यात आले आहेत.
व्हिडिओतील दृश्ये –
सामाजिक माध्यमांत प्रसारित झालेल्या या चलचित्रामध्ये बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर प्रोफेट बजिंदर सिंग संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून ‘लंगर’ दिसत आहे आणि ‘लंगर’समवेत पांढरा वेश परिधान केलेल्या महिला अन् युवती आहेत. ‘लंगर’जवळ एक वृद्ध विवाहित हिंदु महिला हात जोडून डोळे बंद करून देवाकडे काहीतरी मागत असतांना तिच्या समोर १ आणि तिच्या मागे पांढरा वेश परिधान केलेल्या महिला मोठमोठ्याने प्रार्थना करत आहेत अन् या वेळी इतर कार्यकर्ते हात जोडून प्रार्थना करत आहेत, असे दिसत आहे.