Alleged Demolition Of Hanuman Temple : मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी हनुमान मंदिर पाडले !

मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचा आरोप !

भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनने उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सुरेश कुमार कैट यांच्यावर सरकारी गृहनिर्माण संकुलातील हनुमान मंदिर पाडल्याचा आरोप केला आहे. बार असोसिएशनने भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांना पत्र लिहून या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे. या आरोपांवर न्यायमूर्ती कैट यांची प्रतिक्रिया समजू शकलेली नाही.

१. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांना बार असोसिएशनने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मुख्य न्यायमूर्तींच्या बंगल्यात असलेले मंदिर ऐतिहासिक आहे आणि उच्च न्यायालयाचे अनेक माजी मुख्य न्यायमूर्ती या मंदिरात पूजा-अर्चा करत असत. इतकेच नव्हे, तर मुख्य न्यायमूर्तींच्या निवासस्थानी काम करणारे कर्मचारीही मंदिरात प्रार्थना करीत असत.

मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनने भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांना लिहिलेले पत्र –

२. बंगला आणि मंदिर या सरकारी मालमत्ता आहेत. सनातन धर्मावर विश्‍वास ठेवणारे बहुतांश न्यायाधीश आणि कर्मचारी त्यांच्या धार्मिक उपासनेसाठी या मंदिरात जात असत. म्हणूनच सरकारच्या अनुमतीविना किंवा कोणताही कायदेशीर आदेश न देता हे पाडले जाऊ शकत नाही. हे कृत्य सनातन धर्माच्या अनुयायांचा अपमान करणारे आहे, असे या पत्रात म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by LawChakra (@lawchakra)

३. उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष धन्या कुमार जैन म्हणाले की, मुख्य न्यायमूर्ती कैट यांनी मंदिर हटवले आहे. सरकारी गृहनिर्माण संकुलातील हनुमान मंदिर हटवणे योग्य नाही. ही एक गंभीर गोष्ट आहे. या संपूर्ण प्रकरणाचे अन्वेषण केले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.