गावाबाहेरील मुसलमानांना नमाजपठणास बंदी !

  • वाढते अत्याचारांच्या पार्श्‍वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील कल्याणमधील खोणी ग्रामस्थांचा निर्णय !

  • प्रत्येक शुक्रवारी दीड सहस्र मुसलमान नमाजासाठी येत होते !

कल्याण – सध्या सर्वत्र महिलांवर होणारे अत्याचार, वाढती गुन्हेगारी पहाता येथील खोणी ग्रामस्थांनी बाहेरच्या गावातील मुसलमानांना गावातील मशिदीत नमाजपठण करायला येण्यास बंदी घातली आहे. शुक्रवारी बाहेरच्या गावातील मुसलमान गावात आले होते. खोणी ग्रामस्थांनी त्यांना माघारी पाठवले. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये; म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

याविषयी स्थानिक हनुमान ठोंबरे यांनी म्हणाले, ‘‘आमच्या गावात प्रत्येक शुक्रवारी दीड सहस्र मुसलमान नमाजपठणासाठी येतात. आजूबाजूच्या शहरांतील वाढत्या गुन्हेगारीच्या घटना, लव्ह जिहादची प्रकरणे, लहान मुलींवर होणारे अत्याचार यामुळे गावांमध्ये सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. आमच्या गावाची सुरक्षितता हीच आमची सुरक्षितता आहे. स्थानिकांना आमचा कोणताही विरोध नाही. केवळ बाहेरच्या लोकांना गावात येण्यास बंदी केलेली आहे आणि पुढेही बंदी करत राहू. पोलीस प्रशासनाचे आम्हाला सहकार्य आहे, त्यांनी पुढेही सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे.’’

संपादकीय भूमिका

खोणी गावातील ग्रामस्थांना कुणी ‘असहिष्णु’ म्हणून हिणवले, तर आश्‍चर्य वाटणार नाही. असा निर्णय घेण्याची वेळ ग्रामस्थांवर का आली, याची विचार पोलीस, प्रशासन आणि सरकार यांनी करणे आवश्यक !