भाजप आणि मंगळवार पेठ मंडळ यांच्या वतीने ‘वीर बाल दिवस’ साजरा

भाजप मंगळवार पेठ मंडळाच्या वतीने ‘वीर बाल दिवस’ साजरा करतांना पदाधिकारी, विद्यार्थी

कोल्हापूर – ‘नेहरूनगर विद्या मंदिरा’त भारतीय जनता पक्ष आणि मंगळवार पेठ मंडळ यांच्या वतीने ‘वीर बाल दिवस’ साजरा करण्यात आला. सकाळच्या सत्रात जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिखांचे १० वे गुरु गुरुगोविंद सिंह यांची वीर मुले साहिबजादे अजितसिंह, जोरावरसिंह, फतेहसिंह आणि जुझारसिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या निमित्ताने शाळेत आरोग्य पडताळणी शिबिर, रंगभरण, निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धा यांचेसुद्धा आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी या सर्व स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ प्रदेश सचिव महेश जाधव, मंगळवार पेठ मंडल अध्यक्ष सुधीर देसाई यांच्या उपस्थितीत पार पडला.